बुधवारी शिवगर्जना अभियानात निष्ठावान आणि एकनिष्ठ शिवसैनिकांनी उपस्थित राहावे : जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी
औरंगाबाद, २८ फेब्रुवारी : शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर शिवगर्जना अभियान सुरू आहे.
यानिमित्ताने बुधवार १ मार्च रोजी दुपारी ०२:०० वाजता औरंगाबाद येथील तापडिया नाट्यमंदिर येथे भव्य मेळावा आयोजित केला आहे. सर्व निष्ठावान आणि एकनिष्ठ शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी यांनी केले.
या अभियानासाठी माजी आमदार अनिल कदम, डॉ. जयप्रकाश मुंदडा, मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर, युवासेना राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य अंकित प्रभू हे शिवगर्जना मोहिमेत मार्गदर्शन करणार आहे.
शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, विधानपरिषद विरोधी पक्षनेते आंबदास दानवे, आमदार उदयसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या कार्यक्रमास शिवसेना पदाधिकारी आणि शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, अंगीकृत संघटना, आजी माजी पदाधिकारी, शिवसैनिक यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन शिवसेना मराठवाडा सचिव ऍड. अशोक पटवर्धन, सहसंपर्कप्रमुख त्रिम्बक तुपे, ऍड. आसाराम रोठे, शिवसेना जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी, राजेंद्र राठोड, माजी महापौर नंदकुमार घोडेले, भारतीय कामगार सेनेचे चिटणीस प्रभाकर मते पाटील, उपजिल्हाप्रमुख अनिल पोलकर, गणू पांडे, आनंद तांदूळवाडीकर, संतोष जेजुरकर, राजेंद्र राठोड, बाप्पा दळवी, अशोक शिंदे, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, विश्वनाथ स्वामी, विजय वाघचौरे, ज्ञानेश्वर डांगे, विधानसभा संघटक गोपाळ कुलकर्णी, राजू वैद्य, सुशील खेडकर, अक्षय खेडकर, तालुकाप्रमुख बाळासाहेब गायकवाड, राधाकृष्ण भालेकर, शंकरराव ठोंबरे, युवासेना उपसचिव ऋषिकेश खैरे, जिल्हा युवाधिकारी हनुमान शिंदे, महिला आघाडीच्या संपर्क संघटक सुनीता आऊलवार, सहसंपर्कसंघटक सुनीता देव, जिल्हा संघटक प्रतिभा जगताप, जिल्हा समन्वयक माजी महापौर कला ओझा, जिल्हा युवती अधिकारी सानिका देवराज, युवासेना सरचिटणीस किरण तुपे, मिथुन व्यास जिल्हा समनव्यक दत्ता शेलार, संदीप लिंगायत, सतीश पवार, पुनमचंद सलामपुरे, उपजिल्हाधिकारी प्रकाश धुर्वे, नारायण सुरे, शहर अधिकारी सागर खरगे, स्वप्नील दिंडोरे, रामेश्वर कोरडे, आदित्य दहिवाल, बजाजनगर शहरप्रमुख सागर शिंदे, विद्यापीठ प्रमुख नामदेव कचरे, सिनेट सदस्य पुनम पाटील यांनी केले आहे.