उत्तर प्रदेश निवडणूक:शिवसेना उत्तर प्रदेशमधील सर्व 403 जागांवर लढवणार निवडणूक, भाजपला मात देण्यासाठी शिवसेनेची खेळी

उत्तर प्रदेश निवडणूक:शिवसेना उत्तर प्रदेशमधील सर्व 403 जागांवर लढवणार निवडणूक, भाजपला मात देण्यासाठी शिवसेनेची खेळी
Uddhav Thackeray and Yogi Adityanath

उत्तर प्रदेशातील विधानसभआ निवडणुका जवळ आल्या आहेत. दरम्यान शिवसेनेने भाजपला मात देण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. उत्तर प्रदेशातील सर्व 403 जागांवर शिवसेना निवडणूक लढवणार आहे. यासंदर्भात शिवसेने उत्तर प्रदेशचे प्रभारी विश्वजीत सिंह यांनी पत्रक जारी केले आहे.

शिवसेनेने उत्तर प्रदेशमधील सर्व 403 जागांवर निवडणूक लढवणार आहे. महत्त्वाचे म्हणजे शिवसेना ही निवडणूक स्वबळावर लढवणार आहे. या निवडणुकांमध्ये पक्षाने इतर कोणत्याही पक्षासोबत युती केलेली नाही. पण भविष्यामध्ये युती केली जाऊ शकते असे संकेत पक्षाकडून देण्यात आले आहेत. यासंदर्भातील एक पत्रकच शिवसेनेचे उत्तर प्रदेशचे प्रभारी विश्वजीत सिंहांनी जारी केले. या पत्रकामधून शिवसेनेने उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ सरकावर टीका देखील केली आहे.


राज्यामध्ये शिक्षण, रोजगार, कायदा सुव्यवस्था यासारखे प्रश्न सध्या सत्तेत असणाऱ्या भाजपच्या कार्यकाळात निर्माण झाले आहेत. तसेच भाजपला धडा शिकवण्यासाठी सर्वच्या सर्व मतदारसंघांमधून शिवसेना उमेदवार देणार असेही शिवसेनेने जाहीर केले आहे. उत्तर प्रदेशमध्ये जंगलराज सुरु असून महिला आणि मुलींवर अत्याचार होत असल्याची टीका देखील करण्यात आली आहे.​