औरंगाबाद च्या या NGO ने शंभर लोकांना रोजगार मिळवून दिले

औरंगाबाद च्या या  NGO ने शंभर लोकांना रोजगार मिळवून दिले

शंभर लोकांना रोजगार मिळवून देत केले सेवाकार्य...

रोजाबाग इदगाह मैदानात आगळा वेगळा कार्यक्रम...

सफा बैतूल माल व रहेबर फाऊंडेशनची ऐतिहासिक कामगिरी...

हातगाडी सहीत व्यवसायाचे सामान उपलब्ध करून दिले...

औरंगाबाद, दि.31(प्रतिनिधी)
इस्लामच्या शिकवणीणूसार मानवतावादी कार्य व सेवाभावासाठी झोकून देणारी हैदराबाद येथील सेवाभावी संस्था सफा बैतूल मालच्या वतीने रहेबर फाऊंडेशनच्या सहकार्याने ऐतिहासिक औरंगाबाद शहरातील शंभर लोकांना रोजगार मिळवून देण्याचे सेवाकार्य केले.

      रोजाबाग इदगाह मैदानात आगळा वेगळा कार्यक्रम आज सकाळी दहा वाजता मौलाना अब्दुल वहीद हलिमी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. कार्यक्रमाचे आयोजन शहरातील बैतूल मालचे संयोजक मुफ्ती अनिसुर्रहमान व हैद्राबाद येथील मौलाना मुबश्शिर यांनी केले होते.

       मुफ्ती अनिसुर्रहमान यांनी यावेळी सांगितले मागिल तीन महीन्यांपासून गरजूंना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सर्वे करण्यात आला. खरोखरच गरजवंत आहे का याची ओळख करण्यात आली. पाच हजार लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे लक्ष्य आहे. आरोग्य व विविध सेवा अल्प दरात मिळवून देण्यासाठी शहरात सात दवाखाने सुरू आहे. तेथे अल्प दरात तपासणी व औषधोपचार केले जातात. त्यामध्ये दोन डेंटल आहे. एक गेस्ट हाऊस बणवण्याचा संकल्प आहे. गरजूंना अशा प्रकारे स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी समाजाने पुढाकार घ्यावा. आमच्या संस्थेच्या वतीने सर्व जाती धर्मातील लोकांना अशा प्रकारे रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातात.
मौलाना मुबश्शिर यांनी सांगितले अगोदर हैदराबाद येथून हे समाजकार्य सुरू झाले त्यानंतर ज्या ज्या वेळेस समाजावर संकटे येतात तेथे मदत केली जाते. विविध राज्यांतील विविध शहरांत असे समाजोपयोगी उपक्रम घेतले जात आहे. हे मानवतावादी कार्य पुढे चालूच असणार आहे.

      लाभार्थी शेख निसार अब्दुल रज्जाक व रशीद खान यांनी सांगितले आम्हाला हि मदत फार मोलाची आहे. घर भाड्याचे आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी यामुळे मदत होईल. कर्ज सुध्दा होणार नाही. हातगाडी सोबत भांडवल दिल्याने मोठा आधार मिळाला आहे.  

       याप्रसंगी रहेबर फाऊंडेशनचे सैय्यद साबेर, समाजसेवक साजीद मौलाना,मौलाना रशीद मदनी, हाजी जब्बार बागवान, ख्वाजा शरफोद्दीन, अय्यूब सेठ, मौलाना अब्दुल कदीर, हाजी याकूब खान, मुफ्ती अब्दुल रहेमान, अनवर पठाण, शेख यासेर, शेख फरहान, मिर्झा मतीन बेग, मिर्झा शमीम बेग, काजी खलील आदी उपस्थित होते.

       हातगाडी चालकांना हातगाडीवर फळे-भाजी, स्टेशनरी, कटलरी व काटा तराजू , बसण्यासाठी स्टुल आदी सामान भेट म्हणून देण्यात आले.