पोलीस भरती : औरंगाबाद ग्रामीण पोलिसांच्या उमेदवारांना सूचना
औरंगाबाद : पोलीस अधीक्षक कार्यालय, औरंगाबाद ग्रामीण यांचे आस्थापनेवरील पोलीस शिपाई भरती-2021 ची भरती प्रक्रियेतील उमेदवारांची मैदानी चाचणी व शैक्षणिक पात्रता तपासणी प्रक्रियेला दिनांक 02/01/2023 पासुन सुरूवात होणार आहे.
या अनुषंगाने आज दिनांक 30/12/2022 रोजी मनिष कलवानिया, पोलीस अधीक्षक यांनी या सर्व प्रक्रियेबाबत नियोजनाचा आढावा घेवुन सुलभ व पारदर्शक पध्दतीने भरती प्रक्रिया राबविण्याचे दृष्टीकोनातुन अधिकारी व अंमलदार, कार्यालयीन अधिकारी व कर्मचारी यांना सुचना व मार्गदर्शन केले आहे.
पोलीस अधीक्षक, औरंगाबाद ग्रामीण येथे पोलीस शिपाई यांची एकुण 39 पदे असुन या करिता 5725 उमेदवारांनी आवेदनपत्र सादर केली आहेत. या सर्व आवेदनपत्रा नुसार उमेदवारांना भरती प्रक्रिया सुलभ होण्यासाठी प्रत्येक मैदाणी चाचणी करिता उमेदवारांनी प्रवेशपत्रावर देण्यात आलेल्या दिनांका प्रमाणे वेळेत उपस्थित रहावे.
औरंगाबाद ग्रामीण जिल्हा पोलीस शिपाई भरती प्रक्रिया ही तटस्थपणे, नि:पक्षपातीपणे व पारदर्शक होणार असुन या करिता दक्षता अधिकारी म्हणुन
के.एम.मल्लिकार्जुन प्रसन्ना, विशेष पोलीस महानिरीक्षक, औरंगाबाद परिक्षेत्र, औरंगाबाद यांचे भरती प्रक्रियेवर नियंत्रण असणार आहे.
पोलीस अधीक्षकांनी सर्व उमेदवारांना आवाहन केले आहे कि, उमेदवारांची निवड ही पुर्णपणे गुणवत्तेच्या आधारे होणार आहे. शारिरीक व मैदानी चाचण्याची संपुर्ण पणे व्हिडीओग्राफी केली जाणार आहे. त्यामुळे उमेदवार किंवा त्यांचे नातेवाईकांनी कोणत्याही एजंट /दलाल / अधिकारी / कर्मचारी/ यांच्या भुलथापाना/आमिषाला बळी पडु नये. या संपुर्ण प्रक्रियेमध्ये कोणाचाही वशीला/ओळख/याचा उपयोग होणार नाही. कोणीही भरती करुन देणे बाबत प्रलोभन देत असेल तर तात्काळ वरीष्ठ पोलीस अधिकारी यांचेशी संपर्क साधावा.
याचप्रमाणे पोलीस शिपाई भरती - 2021 च्या अनुषंगाने उमेदवारांकरिता सुचना पुढील प्रमाणे :-
1. सर्व उमेदवारांनी मैदानी चाचणी करीता त्यांना देण्यात आलेल्या दिनांकास पोलीस अधीक्षक कार्यालय, औरंगाबाद ग्रामीण, टि.व्ही. सेंटर रोड, सिडको, BxÉ-10 औरंगाबाद येथे सकाळी 05:00 वाजेला उपस्थित रहावे.
2. आवेदन अर्ज भरतेवेळी दिलेले 01 फोटो प्रवेशपत्रावर चिकटवुन, 2 अतिरिक्त फोटोसह प्रवेशपत्र घेऊन यावे. प्रवेशपत्राशिवाय मैदानी चाचणी करिता प्रवेश देण्यात येणार नाही.
3. उमेदवारांनी शासनाने जारी केलेले आधारकार्ड, पॅनकार्ड, मतदानकार्ड, पासपोर्ट, वाहनपरवाना, महाविद्यालयीन ओळखपत्र यापैकी कोणतेही एक मुळ आणि वैध ओळखपत्र सोबत आणणे आवश्यक आहे.
4. भरती प्रक्रियेमध्ये उमेदवारांना मोबाईल,तसेच इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे, प्रतिबंधीत वस्तु स्वत:जवळ बाळगणे पूर्णत: मनाई आहे. अशा वस्तु उमेदवारा जवळ मिळुन आल्यास फौजदारी गुन्हा दाखल होईल.
5. उमेदवार मैदानी चाचणीस गैरहजर राहिल्यास त्याची पुन्हा मैदानी चाचणी घेणेबाबत कोणतीही स्वतंत्र संधी किंवा पुढील तारिख देण्यात येणार नाही. त्यास संपुर्ण भरती प्रक्रियेतुन अपात्र ठरविण्यात येईल.
6. उमेदवाराने भरती प्रक्रियेत उध्दट वर्तन/गैरवर्तन केल्यास त्यास कोणत्याही क्षणी भरती प्रक्रियेतुन बाद करण्यात येईल.
7. भरती प्रक्रिये दरम्यान उमेदवारास शारिरीक इजा/नुकसान झाल्यास त्यास उमेदवार स्वत: जबाबदार राहील. शारिरीक चाचणी व मैदानी चाचणी ही उमेदवाराने स्वत:चे जबाबदारीने पार पाडायची आहे.
8. उमेदवाराने अर्जात व अर्जासोबत दिलेली माहिती अगर कागदपत्रे/प्रमाणपत्रे खोटी सादर केल्याचे किंवा खरी माहिती दडवुन ठेवल्याचे निदर्शनास आल्यास त्यास त्याच टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
9. उमेदवारांनी दिनांक 6/11/2022 रोजी दिलेल्या जाहिरीतीमधील सर्व सुचनांची नोंद घेवुन त्याचे काटेकोरपणे पालन करावे.
10. पोलीस भरती दरम्यान काही अपरीहार्य कारणास्तव सबंधित परीक्षा/चाचण्या व इतर कोणत्याही बाबतीत बदल करावयाचे झाल्यास ते अधिकार पोलीस भरती निवड मंडळाकडे राखुन ठेवण्यात येत आहे.
11. उमेदवारांना शारिरीक व मैदानी चाचणी दरम्यान पूर्व परवानगी शिवाय मैदान मैदान सोडून कोठेही जाता येणार नाही.
12. उमेदवारास भरती दरम्यान काही अडचणी आल्यास 0240- 2381633, 2392151 या क्रमांकावर संपर्क करावा