महाराष्ट्र ख़िदमतुल  हुज्जाज फाउंडेशन - हज -२०२३ साठी ऑनलाईन फॉर्म भरण्यास सुरुवात

महाराष्ट्र ख़िदमतुल  हुज्जाज फाउंडेशन -  हज -२०२३ साठी ऑनलाईन फॉर्म भरण्यास सुरुवात

औरंगाबाद । हज कमिटी ऑफ इंडिया कडून १० फेब्रुवारी २०२३ पासून हज यात्रा २०२३ साठी ऑनलाइन फॉर्म भरण्याच्या प्रक्रियेस सुरुवात करण्यात आली आहे.

       यावर्षी हज्ज यात्रेसाठी जाणाऱ्या इच्छुक यात्रेकरूंच्या सुविधेसाठी, मार्गदर्शनासाठी तसेच मोफत फार्म भरून देण्यासाठी महाराष्ट्र ख़िदमतुल  हुज्जाज फाउंडेशन, औरंगाबाद या एनजीओ  कडून औरंगाबाद शहरात दोन केंद्रे स्थापन करण्यात आलेली आहे.

     महाराष्ट्र ख़िदमतुल  हुज्जाज फाउंडेशन, औरंगाबाद कडून प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे की, इच्छुक हज यात्रेकरूंनी हज यात्रेसाठी व्यवस्थित व बिनचूक फार्म भरवून घेण्यासाठी त्यांनी सुरू केलेले दोन केंद्रापैकी कोणत्याही एका केंद्रावर खालील नमूद आवश्यक कागदपत्रे घेऊन सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेचे दरम्यान उपस्थित राहून फार्म भरवून घ्यावेत.

१- पासपोर्ट, (३१ डिसेंबर २०२३ पर्यंत व्हॅलिड असावे)
२- पासपोर्ट साईज कलर फोटो, (फोटोचा बॅकग्राऊंड पांढरा असावा)
३-  ब्लड ग्रुप कोणता आहे याची माहिती.
४- सोबती यात्रेकरू पैकी एका व्यक्तीचे बँक सेविंग अकाउंट चे पासबुक किंवा कॅन्सल्ड चेक. 
५ - पैन कार्ड
६- वारस म्हणजे नॉमिनीचे नाव आणि मोबाईल नंबर.
७- कोविड वैक्सीनेशन चे सर्टिफिकेट.
८- कवर हेड चा मोबाइल नंबर (ओटीपी जनरेट करण्यासाठी)

      महाराष्ट्र ख़िदमतुल  हुज्जाज फाउंडेशन, औरंगाबाद कडून असेही सुचित करण्यात आले आहे की केंद्रावर येतांना महिला आणि बालकांना आणण्याची गरज नाही, कोणीही एक व्यक्ती येऊन फार्म भरवून घेऊ शकतो.

     महाराष्ट्र ख़िदमतुल  हुज्जाज फाउंडेशन, औरंगाबाद कडून सुरू करण्यात आलेले दोन्ही केंद्रांचे पत्ते खालील प्रमाणे आहेत.

१- नॅशनल प्लायवूड, नायरा पेट्रोल पंपा जवळ, आझाद चौक, औरंगाबाद.
२- एस एम कन्स्ट्रक्शन्स, शॉप नंबर 19, श्रीकृष्ण विहार अपार्टमेंट, युनियन बँकेसमोर, ज्योती नगर, औरंगाबाद.

      मार्गदर्शनासाठी आणि इतर माहितीसाठी  महाराष्ट्र ख़िदमतुल  हुज्जाज फाउंडेशन, औरंगाबाद चे खालील नमूद पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधता येईल.

• सैय्यद नबील भाई - 9890570905.
• सैय्यद इरफानोद्दीन- 9822663511.
• साजेद मौलाना- 9850884952.
• मश्शू सर (ज़कीउद्दीन)- 9503385845.
• हामद चाऊस - 9850134550.
• सैय्यद हयास सरपंच- 8007903858.
• सरताज खान RTO - 9503805888
• याकूब खान- 9822344358.
• शेख सलीम- 8329686039.
• सैय्यद सलीम- 8657185505.