स्पर्धा परीक्षेला बसला डमी कँडिडेट : बिंग फुटताच ठोकली धूम
औरंगाबाद : व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालय द्वारा आयोजित Group - C परीक्षेत डमी कॅंडिडेट आढळून आला. त्याच्याकडे विचारपूस करताना तो परीक्षा सेंटर मधून पळून गेला. मात्र थोड्याच वेळात त्याच जागी मूळ कॅंडिडेट अवतरला. त्याच्याकडे चौकशी करण्यात आली असता त्याने आपल्या जागी एक डमी कॅंडिडेट पाठवला असल्याची कबुली दिली. त्याला परीक्षा सेंटरच्या मॅनेजमेंट ने पोलिसांच्या स्वाधीन केले. सदरची घटना ही चिकलठाणा एमआयडीसी परिसरातील आय टी ऑनलाईन परीक्षा केंद्रात रविवारी सकाळी घडली.
या प्रकरणात पोलिसांकडे करण्यात आलेल्या तक्रारीनुसार पोलीस स्टेशन एमआयडीसी सिडको येथे मूळ कॅंडिडेट श्रीकांत सुखदेव केदारे आणि डमी कँडिडेट या दोघांचे विरुद्ध अपराध क्रमांक 194/2024 कलम 419, 420, 34 भारतीय दंड विधानासह कलम 7 महाराष्ट्र विद्यापीठाच्या, मंडळाच्या व इतर विनिर्दिष्ट परीक्षांमध्ये होणाऱ्या गैरप्रकारास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम सन 1982 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मूळ कॅंडिडेट श्रीकांत सुखदेव केदारे यास अटक करण्यात आली आहे. त्यास न्यायालयात हजर करण्यात आली असता 19 एप्रिल पर्यंत त्यास पोलीस कस्टडी रिमांड मध्ये पाठविण्यात आले आहे. चौकशी दरम्यान त्याने डमी गाणी राहुल असल्याचे सांगितले. यासंबंधी सविस्तर तपास पोलीस उपनिरीक्षक आत्माराम घुगे करीत आहेत.
परीक्षा केंद्रात केंद्रप्रमुख अंबाडे यांनी संशयावरून डमी कॅंडिडेट ची झडती घेतली असता त्याच्याकडे मक्खी इयरफोन, ब्लूटूथ डिवाइस, मोबाईल हँडसेट सापडले आहे. त्याला चौकशीसाठी परीक्षा केंद्राबाहेर आणण्यात आले असता तो तिथून पळून गेला.