दरोडेखोरांना पकडण्यात मदत करणाऱ्या युवकांचा पोलीस अधीक्षकांकडून सत्कार

दरोडेखोरांना पकडण्यात मदत करणाऱ्या युवकांचा पोलीस अधीक्षकांकडून सत्कार

औरंगाबाद : शेतकऱ्यांना मारहाण करून बळजबरी ने जनावरे घेऊन  जाणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळीला पकडण्यात मदत करणा-या करंजखेड येथील ग्रामरक्षक दलातील युवकांचे औरंगाबाद ग्रामीण पोलीस अधीक्षक यांनी प्रशंसापत्र देवुन गौरव करुन दिली कौतुकाची थाप ….
     दिनांक 22/9/2022 रोजी औरंगाबाद ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालय, येथे मासिक गुन्हे आढावा बैठकीच्या दरम्यान  मनिष कलवानिया, पोलीस अधीक्षक यांनी जिल्हयातील पोलीस ठाणे पिशोर हद्यीतील करंजखेड येथील ग्रामरक्षक दलांचे युवकांनी केलेल्या कामगिरीबाबत त्यांची प्रशंसा करुन त्यांना प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा गौरव केला आहे.
       या ग्रामरक्षक दलाचे युवकांनी पोळयाचे पुर्व संध्येला दिनांक 26/8/2022 रोज रात्रीचे 2 ते 2:30 वाजेच्या सुमारास गावात पायी गस्त घालत असतांना त्यांना एक वाहन येतांना दिसले त्यांना त्यास थांबण्याचा ईशारा केला परंतु वाहनचालकाने वाहन सुसाट पळवले यावरून त्यांना संशय आल्याने त्यांनी तात्काळ पिशोर पोलीस स्टेशनला गाडीच्या वर्णनाची माहिती दिली यावरुन पोलीसांना तलवाडी फाटा रोडवर ते वाहन अडवण्यात यश आले.
     त्यामध्ये दोन बैल व एक गाय चोरी करून नेत असल्याचे समजले. यातील जनावरे उमरखेड,  गोकुळवाडी, खातखेड या भागातील शेतवस्तीवर  शेतक-याला मारहाण करून बळजबरीने घेऊन गेल्याचे (दरोडा टाकुन) निष्पन्न झाले होते. ग्रामरक्षक दलाचे युवकांचे सर्तकतेमुळे त्यांचे परिसरातील शेतक-यांची मारहाण करून बळजबरीने घेऊन गेलेली जनावरे ही त्यांना परत मिळण्यास मदत होऊन यातील पाच आरोपीतांना पकडण्यात पोलीसांना यश आले होते. 
     यामध्ये करंजखेड येथील ग्रामरक्षक दलाचे युवकामध्ये शेख इमरान मोहमंद, 2) शेख रहिम जिलानी 3) शेख रमजान रफिक 4) खलिल सलीम शेख 5) रियाज खान सिराज खान  सर्व रा. करंजखेडा यांचा  पोलीस अधीक्षक यांनी प्रशंसा करुन त्यांना प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा गौरव केला आहे. ही बाब इतरही ग्रामरक्षक दलांचे युवकांना निश्चितच प्रोत्साहन व स्फूर्ती देईल.
      तसेच यातील आरोपीतांना जेरबंद करणा-या पिशोर ठाण्याचे सपोनि कोमल शिंदे, पो.उप.नि. विजय आहेर, पो.उप.नि. सतिष बढे, पोलीस अंमलदार गजानन क-हाळे, सोपान डकले, लालचंद नागलोद, सतीष देसाई, कौतीक सपकाळ, यांचा सुध्दा प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा गौरव केला आहे.