अट्टल घरफोडी करणारे पाच चोर पोलिसांच्या जाळ्यात! मात्र पोलिसांनी त्यांचे चेहरे झाकले – जनतेत संशयाचा भडका!

अट्टल घरफोडी करणारे पाच चोर पोलिसांच्या जाळ्यात! मात्र पोलिसांनी त्यांचे चेहरे झाकले – जनतेत संशयाचा भडका!

छत्रपती संभाजीनगर, दि. २५ ऑक्टोबर – करमाड परिसरात घरफोड्यांचे सत्र सुरू असताना अखेर पोलिसांनी पाच अट्टल चोरांना जेरबंद केलं. १ लाख ८२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत झाला, आणि पोलिसांनी स्वतःची पाठ थोपटलीही!
पण या सर्वात एक विचित्र गोष्ट घडली –
घरफोडी करणाऱ्या चोरांचे चेहरे पोलिसांनी काळ्या कपड्याने झाकून फोटो काढले!

आता प्रश्न असा –
> "अहो, शहरात किरकोळ गुन्हे करणाऱ्यांची पोलिस धिंड काढतात, चेहऱ्यावर काळं कपडं नाही! मग अट्टल घरफोड्यांचे चेहरे झाकायची एवढी दया का?"

???? काय आहे प्रकरण?
मौजे कुंभेफळ येथील न्यू श्रीराम इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक दुकान फोडून इलेक्ट्रॉनिक वस्तू चोरल्या गेल्या.
दुकानदार संदीप मुळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून करमाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड आणि अपर पोलिस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांच्या पथकाने कारवाई केली.

गुप्त बातमीदाराच्या मदतीने पोलिसांनी महिंद्रा बोलेरो पिकअप (MH-17-BY-8260) सुंदरवाडी शिवारात सापळा रचून अडवली.
गाडीमध्ये चोरी केलेल्या वस्तू आणि पाच चोर सापडले.

???? पकडलेले आरोपी:
1. मनोज सुनिल लिंभोरे, रा. प्रवरासंगम
2. संतोष अशोक जाधव, रा. प्रवरासंगम
3. सुहास रामकिसन धोत्रे, रा. प्रवरासंगम
4. धर्मेंद्र मांजीलाल गुंगले, रा. प्रवरासंगम
5. अजय अनिल गायकवाड, रा. वाळुंज

या टोळीने केवळ करमाडच नव्हे तर फुलंब्री, विरगाव आणि वैजापूरमध्येही घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे.

???? पण मोठा प्रश्न – चेहरे झाकले का?

पोलिसांनी प्रेस नोटसह आरोपींचा फोटो प्रसिद्ध केला,
मात्र प्रत्येकाचा चेहरा काळ्या कपड्याने झाकलेला!
यामुळे लोकांत संताप उसळला आहे.

> “अहो, अट्टल घरफोडी करणाऱ्यांचे चेहरे जनतेला दाखवायचे नाहीत,
पण किरकोळ भांडण करणाऱ्यांना पोलिस स्वतःच रस्त्यावर ओढतात!
हा दुहेरी मापदंड का?”

काही नागरिकांचे म्हणणे आहे की –
> “काय पोलिसांचे या चोरट्यांशी काही साटेलोटे आहेत का?
नाहीतर चेहरा लपवायचं कारण काय?”

पोलिसांच्या या दुटप्पी भूमिकेमुळे जनतेमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.
घरफोडी करणाऱ्यांची ओळख स्पष्ट दाखवून त्यांना धडा शिकवण्याची अपेक्षा असताना,
त्यांचे चेहरे झाकून पोलिसांनी स्वतःवरच प्रश्नचिन्ह उभे केले आहे. हे आरोपी काही लुटारू किंवा दरोडेखोर तर नव्हते की त्यांची ओळख परेड करायची होती म्हणून त्यांचे चेहरे कळ्या कपड्यांनी झाकण्यात आले?

"अट्टल गुन्हेगारांचे चेहरे झाकणाऱ्या पोलिसांनी आरसा बघावा!"
जनतेचा हा आवाज आता छत्रपती संभाजीनगरात घुमू लागला आहे.