बघता बघता पाय काळा पडला आणि…..

बघता बघता पाय काळा पडला आणि…..

भंडारा : पायाला काहीतरी चावलं म्हणून 6 वर्षांची चिमुकली झोपेतून उठली, बघता बघता पाय काळा पडला आणि…
 रात्री लक्ष्मी नेहमीप्रमाणे आईसोबत जमिनीवर झोपली होती. मध्यरात्री तिला काहीतरी चावल्यासारखं वाटलं म्हणून ती जागी झाली. तिने आईला उठवलं आणि सांगितलं. आईने बघितलं, तर तिच्या उजव्या पायाला काहीतरी झालं होतं.
भंडारा  जिल्ह्यातील पवनी  तालुक्यात एक दुःखद घटना घडली. एका सहा वर्षांच्या  चिमुकलीचा अचानक मृत्यू झाला. रात्री आईच्या कुशीत झोपलेल्या या चिमुकलीला काही तरी चावलं असं वाटलं, म्हणून ती झोपेतून जागी झाली. तिनं आईला सांगितलं. बघता बघता या चिमुकलीचा पाय काळा पडला. आई-वडील चिमुकलीला घेऊन दवाखान्यात घेऊनही गेले. पण काही वेळातच तिचा मृत्यू झाल्यानं पालकांच्या पायाखालची जमीनच सरकली. पोटच्या मुलीचा मृत्यू झाल्याने तिच्या आईवडिलांना मोठा धक्काच बसला. सर्पदशांमुळे या मुलीचा मृत्यू झाल्याची माहिती आता समोर आलीय.
पवनी तालुक्यात पिंपळगाव इथं मध्यरात्री ही दुर्दैवी घटना घडली. लक्ष्मी जितेंद्र सुखदेवे असं मृत्यू झालेल्या मुलीचं नाव आहे. लक्ष्मी अवघी सहा वर्षांची होती. चिमुकल्या लक्ष्मीच्या मृत्यूने गावावर शोककळा पसरलीय.
     रात्री लक्ष्मी नेहमीप्रमाणे आईसोबत जमिनीवर झोपली होती. मध्यरात्री तिला काहीतरी चावल्यासारखं वाटलं म्हणून ती जागी झाली. तिने आईला उठवलं आणि सांगितलं. आईने बघितलं, तर मुलीच्या उजव्या पायाच्या बोटाजवळ काहीतर चावल्याचं दिसून निदर्शनास आलं.
      दरम्यान, लक्ष्मीचे वडील जितेंद्र सुखवेदे हे देखील जागे झाले. बघता बघता लक्ष्मीचा पाय काळा पडू लागला होता. अखेर तिला सर्पदंश झाल्याची खात्री पटली. म्हणून आईवडिलांनी तिला लगेचच रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी धडपड केली.
      चिमुकल्या लक्ष्मीला घेऊन तिचे आईवडील तत्काळ कोंढा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल झाले. पण काही वेळातच तिचा मृत्यू झाला. मुलीचा रातोरात मृत्यू झाल्यानं तिच्या आईवडिलांना मोठा धक्काच बसला. मुलीचा सर्पदंशामुळे मृत्यू झाल्याचं कळल्यानंतर तिच्या आईवडिलांनी केलेला आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता.