केंद्र शासनाच्या योजनाच्या अंमलबजावणीस गती द्या - रावसाहेब पाटील दानवे

केंद्र शासनाच्या योजनाच्या अंमलबजावणीस गती द्या - रावसाहेब पाटील दानवे

जिल्हा विकास समन्वय व नियंत्रणसमितीची बैठक संपन्न 
• केंद्र शासनाच्या योजनाच्या अंमलबजावणीस गती द्या - रावसाहेब पाटील दानवे
 औरंगाबाद दि. 20 –  केंद्र शासनाची पंतप्रधान आवास योजना, जलजीवन मिशन, स्वच्छ भारत मिशन, उज्वला गॅस योजना, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनांच्या अंमलबजावणीस गती देऊन सर्वसामान्यांना सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. असे निर्देश जिल्हा विकास समन्वय व नियंत्रण समितीचे (दिशा) अध्यक्ष तथा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी आज येथे केले.
 जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात सर्व केंद्र शासनाचा योजनाचा आढावा विभागनिहाय घेण्यात आला. यावेळी केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ.भागवत कराड, खासदार इम्तीयाज जलील, आमदार हरीभाऊ बागडे, आमदार रमेश बोरनारे, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, महानगरपालिका आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांच्यासह सर्व विभागप्रमुख या बैठकीस उपस्थित होते.
 प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंमलबजाणीस गती देऊन, सर्वसामान्यांना घर व हक्काचा निवारा उपल्बध करुन देण्यामध्ये महानगरपलिका आणि जिल्हा प्रशासनाने तातडीने गती द्यावी. कामकाजात दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारा कडून दंड वुसल करण्या बाबत महापालिका आयुक्ताना श्री. दानवे यांनी निर्देश दिले.
 याबरोबरच प्रधानमंत्री कृषी सिंचान योजना, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा आढावा घेतल्यानंतर कुशल मनुष्यबळ निर्माण होऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील,अश्या प्रकाराच्या प्रशिक्षण  सत्र आणि अभ्यासक्रमाचा सुधारीत आराखडा तयार करण्याचे निर्देश कौशल्य व रोजगार विभागाला देण्यात आला.
 डॉ.भागवत कराड म्हणाले की, प्रधानमंत्री पिक विमा योजना, किसान क्रेडीट कार्ड,  त्याचप्रमाणे इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, विधवा निवृत्ती योजना, दिव्यांग निवृत्ती वेतन याविषयीचे लाभ बॅकांनी लाभर्थ्यांना तात्काळ वितरीत करावे असे निर्देश दिले. याबरोबरच डिजीटल इंडिया, बेटी बचाव बेटी पढाओ, राष्ट्रीय स्वास्थ मिशन या योजनेच्या बाबतीत उद्ष्टि पूर्ण करण्याबाबत  संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितले .
 खासदार इम्तीयाज जलील यांनी सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत जिल्ह्याचे साक्षरतेचे प्रमाण, शाळाबाह्य मुलांचा प्रश्नाबाबत शिक्षण विभागाने केलेल्या उपाययोजनेचा आढावा घेऊन दिशा समितीची बैठक वर्षातून दोनदा आयोजित करण्याची सुचना बैठकीत मांडली. यामुळे केंद्र शासनाच्या योजनाची अंमलबजावणी विषयीचा वारंवार आढावा घेतल्याने गती प्राप्त होईल असे सांगितले.
 आमदार हरीभाऊ बागडे यांनी प्रधानमंत्री ग्राम सडक योजचे काम गुणवत्तापूर्ण आणि विहित वेळेत पूर्ण करण्याबाबतची मागणी अध्यक्षांकडे केली. तसेच रस्त्याच्या गुणवत्ता तपासणीचे कामकाज पूर्ण करुन ग्रामीण भागात चांगल्या दर्जाचे रस्ते उपलब्ध व्हावे यासाठी प्रशासनाच्या समन्वयाने वारंवार तपासणी , आढावा, प्रत्यक्ष भेटी द्याव्यात अशी सूचना केली.
 आमदार रमेश बोरनारे यांनी गंगापूर- वैजापूर तालुक्यातील जलजीवन मिशनचे काम पूर्ण करण्याबाबत तसेच ग्रामीण विकास केंद्र (आरटीसी) च्या उपक्रमातून ग्रामीण भागाचा आर्थिक विकास साध्य व्हावा. यासाठी अधिकचा निधीची तरतूद केंद्र सरकारच्या माध्यमातून करण्याबाबतची मागणी बैठकीत मांडली.
 केंद्र शासनाच्या एकूण 40 योजनांची अंमजबजावणी, लक्षांक, उदिष्टपूर्ती व असलेल्या अडचणी याविषयी चर्चा करण्यात आली. आवास योजना, कृषी सिंचन योजना, कौशल्य विकास, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, स्वच्छ भारत मिशन, प्रधानमंत्री पिक विमा योजना आणि पंडीत दिनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योती योजनाचे उदिष्ट वेगाने पूर्णकरण्याबाबतचे पूर्ण निर्देश जिल्हा प्रशासनाला व संबंधित विभागप्रमुखाला देण्यात आले.