रविवार पासून खंडाळ्यात राज्यस्तरीय महिला किर्तन महोत्सवास प्रारंभ...

रविवार पासून खंडाळ्यात राज्यस्तरीय महिला किर्तन महोत्सवास प्रारंभ...

खंडाळ्यात रविवारपासून राज्यस्तरीय महिला किर्तन महोत्सवास प्रारंभ.....

वैजापूर : (प्रतिनिधी) वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथे जगदंबा माता नवरात्र कोजागिरी महोत्सव निमित्त मातोश्री नर्मदा प्रतिष्ठान व शिवसेना शाखा खंडाळा आयोजित गुरु भगवंताच्या कृपेने व साधुसंतांच्या आई-वडिलांच्या आशीर्वादाने तसेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेतून शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे आमदार प्रा. रमेश बोरनारे यांच्या सहकार्याने समाज प्रबोधनकार हभप विशाल महाराज तिकांडे हभप सौ जयश्री विशाल महाराज तिकांडे यांच्या मार्गदर्शनाने माँसाहेब मीनाताई बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरीय महिला किर्तन महोत्सव 2021 येत्या रविवारपासून श्री संत जगद्गुरू तुकाराम महाराज मंदिर प्रागनात सुरवात होत आहे.

या दहा दिवस चालणाऱ्या कीर्तन महोत्सवात रोज रात्री 8 वाजता विविध कीर्तनाचे आयोजन केलेले आहे यात;
• रविवार दि.10 रोजी हिंदू धर्म भुषण शिवसाधिका साध्वी दुर्गादीदी बिडकीन संभाजीनगर केशव महादु सुर्यवंशी, ग्रामसेवक सुभाष शहादु सुर्यवंशी,माजी ग्रामपंचायत सदस्य सुरज लक्ष्मण सुर्यवंशी,एल आय सी एजंट खंडाळा यांच्या वतीने किर्तन सेवा..
• सोमवार दि. 11 रोजी झी टॉकीज फेम हभप प्रतिभाताई कोकाटे छत्रपती संभाजीराजे मुला मुलींची वारकरी शिक्षण संस्था आळंदी संजय सोमा कटारे,सुपरवाझर साईनाथ जनार्दन भोपळे,साईरुद्र भेळ भांडार खंडाळा यांच्या वतीने किर्तन सेवा.‌‌.
• मंगळवार दि. 12 रोजी हभप भारतीताई गाडेकर नागमठाण वैजापूर प्रकाश गोपीनाथ आंबेकर,भोले वैभव टी हाऊस खंडाळा यांच्या वतीने किर्तन सेवा..
• बुधवार दि. 13 रोजी समाजप्रबोधनकार हभप रोहिणीताई कार्ले कासारे ता. संगमनेर रंजीत सुर्यवंशी, संतोष पवार, संतोष गाडेकर,गोरख भोपळे, यांच्या वतीने किर्तन सेवा..
• गुरुवार दि. 14 रोजी समाज प्रबोधनकार हभप मुक्ताताई सोनवणे कुलस्वामिनी मुलींची वारकरी शिक्षण गुरुकुल नाशिक प्रकाश पंढरीनाथ चव्हाण,माजी उपनगराध्यक्ष व गटनेते वैजापूर यांच्या वतीने किर्तन सेवा..
• शुक्रवार दि. 15 रोजी विजयादशमीनिमित्त खास आकर्षण कीर्तनाची जुगलबंदी झी टॉकीज फेम समाजप्रबोधनकार कु. मुक्ताई चाळक, शिरूर व सौ. शिवानी चाळक पुणे आमदार रमेश पाटील बोरनारे यांच्या वतीने किर्तन सेवा..
• शनिवार दि. 16 रोजी भागवताचार्य हभप राधिकाताई घुले कारेगांवकर डॉ.नय्युम पटेल, डॉ.मंगेश बहाळस्कर संजीवनी हॉस्पिटल व आयसीयु सेंटर वैजापूर यांच्या वतीने किर्तन सेवा..
• रविवार दि. 17 रोजी समाजप्रबोधनकार हभप सौ. पुजाताई वाघ दिंडोरी नाशिक स्व मोसंबाबाई धन्नालालजी कासलीवाल व धन्नालालजी कुंजीलालजी कासलीवाल, यांच्या स्मरणार्थ संतोष सेठ कासलीवाल, संतोष क्लॉथ स्टोअर्स खंडाळा यांच्या वतीने किर्तन सेवा.. 

• सोमवार दि. 18 रोजी सकाळी दहा वाजता जयश्रीताई महाराज तिकांडे उपाध्यक्ष आखील वारकरी महिला आघाडी संघ महाराष्ट्र राज्य पुणे विभाग यांचे काल्याचे किर्तन होऊन महाप्रसादाचे वाटप होईल  माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या वतीने काल्याचे किर्तन सेवा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहेत.