महमूद दरवाजा अखेर वाहतुकीस खुला : जड वाहनांना प्रवेशबंदी

महमूद दरवाजा अखेर वाहतुकीस खुला : जड वाहनांना प्रवेशबंदी

औरंगाबाद :  26 फेब्रुवारी :पाणचक्की प्रवेश द्वाराजवळील मेहमूद दरवाजा दोन वर्षांच्या दुरुस्तीनंतर काल रविवार पासून  वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. मागील दोन वर्षांपूर्वी एका जड वाहनाने या दरवाजाचे कमानीला धडक दिल्याने कमानीचा काही भाग मोडकळीस आला होता.  कोणत्याही क्षणी दरवाजा काेसळेल अशी परिस्थिती निर्माण झाली होती. तेव्हापासून या दरवाजा मधून वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली होती. इतिहास प्रेमींनी या दरवाजाच्या दुरुस्तीसाठी प्रयत्न केल्यामुळे स्मार्ट सिटी प्रशासनाने १ कोटी खर्च करून दरवाजाला गतवैभव प्राप्त करून दिले. 

      G-20 परिषदेच्या एक दिवसा अगोदर रविवारी दरवाजा वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला.

     शहरातील काही दरवाजे दरवाजे राज्य, आणि काही दरवाजे केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारीत आहेत. परंतु पानचक्की प्रवेशद्वाराजवळील हा  मेहमूद दरवाजा कोणाच्याही अखत्यारीत नाही. आता दरवाजाखालून ये-जा करण्यासाठी मोठ्या, जड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. औरंगाबाद महानगरपालिकेने दरवाजाच्या दोन्ही बाजूने लोखंडी रॉड लावले आहेत.