मुख्यमंत्री यांच्या स्वागतासाठी खा. इम्तियाज़ जलील यांनी घेतली मराठवाड्यातील मावळ्यांची बैठक

मुख्यमंत्री यांच्या स्वागतासाठी खा. इम्तियाज़ जलील यांनी घेतली मराठवाड्यातील मावळ्यांची बैठक
MP Imtiyaz Jaleel addressing the meeting to welcome CM

मुख्यमंत्री व १४ कर्तृत्वान महापौरांनी औरंगाबादसाठी केलेले विकास कामे उल्लेखनिय व अविश्वसनीय – खासदार इम्तियाज जलील

औरंगाबाद : मराठवाड्यास अतिजास्त भरीव निधी देवुन विविध लोकोपयोगी प्रकल्प, प्रस्ताव व नागरीकांच्या मुलभुत समस्याचे निवारण करुन मराठवाड्याचा सर्वांगिण विकास केल्यानंतर मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त सिध्दार्थ उद्यानातील स्मृतीस्तंभाजवळ ध्वजारोहणाच्या मुख्य शासकीय समारंभात उपस्थित राहण्यासाठी औरंगाबाद स्मार्ट सिटीत आगमन करणारे माननीय मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे साहेबांचे मराठवाड्यांवर प्रेम करणारे सर्व मावळे मराठवाड्याच्या संस्कृतीनुसार चिकलठाणा विमानतळापासून ते सिध्दार्थ गार्डन पर्यंत तुतारी वाजवुन पुष्पवृष्टीने जंगी स्वागत करुन आभार व्यक्त करणार आहे. मुख्यमंत्र्याच्या जंगी स्वागताच्या पुर्वतयारीकरिता मराठवाड्यावर प्रेम करणाऱ्या सर्व मावळ्यांची आज बैठक दारुस्सलाम, बुड्डीलेन येथे खासदार इम्तियाज जलील यांच्या उपस्थितीत पार पाडली.  

          सदरील बैठकीमध्ये मुख्यमंत्री व १४ कर्तृत्वान महापौरांनी मराठवाडा व औरंगाबाद स्मार्ट सिटी करिता केलेल्या विकास कामांबाबत सविस्तर चर्चा झाली. औरंगाबाद चिकलठाणा विमानतळापासुन ते सिध्दार्थ गार्डनपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा व प्रत्येक चौकात मराठवाड्याचे मावळे कोणत्याही प्रकारची घोषणा न देता कोरोना संदर्भातील नियमावलींचे पालन करुन लाडक्या मुख्यमंत्र्याच्या ताफ्यावर पुप्षवृष्टी करुन त्यांनी व त्यांच्या १४ कर्तृत्वान महापौरांनी केलेल्या विकास कामांचे माहिती फलक दाखविले जाणार आहे. शिवसेना पक्षाचे १४ कर्तृत्वान महापौरांनी औरंगाबादेत केलेल्या विकास कामांच्या श्रेयात बीजेपी ही तेवढीच सहभागी आहे. कारण १४ कर्तृत्वान महापौर बीजेपीच्या पाठींब्यानेच औरंगाबाद महानगरपालिकेत विराजमान झाले होते.

          मुख्यमंत्री व १४ कर्तृत्वान महापौरांनी औरंगाबादेत विकासाची गंगा वाहिली व संपुर्ण जगात औरंगाबादचे नाव लौकिक केल्याने त्यांच्या स्वागत समारंभात कोणत्याही प्रकारची हलगय व हलगर्जीपणा खपवुन घेतला जाणार नसल्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी म्हटले आहे.