मुंब्रा लोकल ट्रेन अपघात : समाजवादी पक्षाची सरकारकडे ठोस मागणी

मुंब्रा लोकल ट्रेन अपघात : समाजवादी पक्षाची सरकारकडे ठोस मागणी

मुंबई: मुंब्रा येथे झालेल्या दुर्दैवी लोकल ट्रेन अपघातानंतर समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि आमदार अबू आझमी यांनी घटनास्थळाला भेट दिली. त्यांनी अपघातात मृत झालेल्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली तसेच जखमी प्रवाशांना रुग्णालयात जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

        या दुर्घटनेत अनेक सामान्य मेहनती मध्यमवर्गीय लोकांचा बळी गेला आहे. या लोकांना रोज आपल्या नोकरी-व्यवसायासाठी जीव धोक्यात घालून लोकल ट्रेनने प्रवास करावा लागतो. सरकारने जर यांच्याबद्दल थोडीशी तरी चिंता दाखवली असती, तर आज प्रवाशांना भेड़-बकरीप्रमाणे ट्रेनमध्ये चढावे लागले नसते आणि हा भीषण अपघात टाळता आला असता. या अपघातात एक पोलीस जवानही शहीद झाला, ही अतिशय दुःखद गोष्ट आहे.

       अबू आझमी यांनी रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चा करताना लोकल ट्रेनमध्ये होणारी प्रचंड गर्दी, विशेषतः पीक अवर्समध्ये, ही प्रमुख समस्या असल्याचे सांगितले. त्यांनी मागणी केली की बकरी ईदसारख्या सणांवेळी जशी क्षमतेपेक्षा जास्त बकऱ्या वाहनांमध्ये वाहतूक करण्यात येऊ नये म्हणून  प्रशासनाकडून सतर्कता बाळगली जाते, तशीच काळजी दररोज ट्रेनने प्रवास करणाऱ्या मुंबईकर मेहनतकऱ्यांसाठी घेतली जावी.

मुख्य मागण्या:
पीक अवर्समध्ये लोकल ट्रेन्सची संख्या व फ्रीक्वेन्सी वाढवण्यात यावी.

मृत प्रवाशांच्या कुटुंबीयांना किमान ₹25 लाखांची मदत द्यावी.

जखमी प्रवाशांच्या कुटुंबीयांना शासकीय नोकरी देण्यात यावी.

           समाजवादी पक्षाने जाहीर केले आहे की हा मुद्दा ते संसदेत येणाऱ्या मानसून अधिवेशनात जोरदारपणे मांडणार आहेत आणि केंद्र सरकारवर ठोस कारवाईसाठी दबाव आणणार आहेत.