रोड रॉबरी करणारे लुटारूंना सिनेमा स्टाईल पाठलाग करून जेरबंद करण्यात वैजापुर पोलीसांना यश
औरंगाबाद, 25 फेब्रुवारी : दिनांक 24/02/2023 रोजी 23.30 वाजताच्या सुमारास डायल 112 वर माहिती मिळाली की, शिवराई. ता. वैजापूर शिवारात रोडने जाणाऱ्या दोन मोटार सायकल स्वारांना पांढऱ्या रंगाची बोलेरो गाडी क्रमांक- MH-23-AD-1216 ज्यामध्ये चार ईसम असुन त्यांच्याकडे लोखंडी रॉड, चाकू असे घातक शस्त्र असुन त्यांनी त्या मोटार सायकल स्वारांना व त्यांच्या सोबतच्या महिलांना मारहान करुन त्यांच्या अंगावरील सोने व पैसे लुटुन नेले आहेत. व ती गाडी लासुर स्टेशनच्या दिशेने गेली आहे.
जबरी चोरीचे मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने मनीष कलवनिया, पोलीस अधीक्षक औरंगाबाद ग्रामीण यांनी तात्काळ स्वतः वायरलेस द्वारे सर्व प्रभारी अधिकाऱ्यांना संपूर्ण जिल्ह्यात नाकाबंदी करण्याचे आदेश दिले.
याचप्रमाणे वैजापूर उपविभागातील सर्व पोलीस ठाणे अंतर्गत पोलिसांची पथके तयार करून त्यांना संशयित वाहनाला पकडण्याच्या सूचना दिल्या.
त्याचप्रमाणे वैजापूर पोलिसांची तीन पथके तयार करून एक पथक शिवराई, करंजगांव भागाकडे रवाना केले. तर दुसरे पथक डॉ. आंबेडकर पुतळा, वैजापुर येथे व तीसरे पथक गंगापूर चौफूली नाकाबंदीसाठी लावले.
यावेळी संशयित वाहनाने आंबेडकर चौकातील नाका बंदी साठी लावलेले बॅरॅकेट्स भरधाव वेगाने तोडून पुढे येवला रोड रोडच्या दिशेने सुसाट वेगाने निघाले. वैजापूर पोलिसाच्या सर्व पथकांनी वाहनाचा पाठलाग सुरू केला. हा थरार रात्रीच्या दोन वाजेपर्यंत सुरू होता. पोलीस मागावर असल्याचे बघून आरोपीनी त्यांचे वाहन पुरणगाव रोडकडे नेऊन शेतीच्या कडेला लावून वाहन लॉक करून अंधारात शेताच्या दिशेने पळत सुटले. यावेळी मागावर असलेल्या पोलिसांनी सुद्धा त्यांचा शेवटपर्यंत पाठलाग सुरू ठेवून अंधाऱ्या शेतामध्ये दोन किलोमीटर पर्यंत पळत जाऊन दोन चोरट्यांच्या मुस्क्या आवळून त्यांना जेरबंद केले. दोन आरोपी हे अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले.
यावेळी 1) सौरभ उर्फ बाबू विकी रुझासिओ वय 19 वर्ष रा. ईनामवाडी, शिर्डी ता. जि. अहमदनगर, 2) कृष्णा प्रकाश भोळे वय 24 वर्ष रा. आंबेडकर नगर सिन्नर जि.नाशिक यांना पकडण्यात आले.
पकडलेल्या दोन आरोपीतांकडून दोन लोखंडी रॉड, एक बोलेरो गाडी क्रमांक- MH-23-AD- 1216 हे जप्त करण्यात आले आहे..
यातील जखमी नामे- ज्ञानेश्वर सुभाष डुकरे वय 26 वर्ष व्यवसाय शेती व होमगार्ड रा. तिडी, ता. वैजापुर जि. औरंगाबाद यांचे जबाब नोंदवून कलम 394 भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे . पूढील तपास वैजापूर पोलीस करीत आहे.
रोड रॉबरी करणाऱ्या या चोरट्यांची 23.30 वाजेला माहिती मिळतात अत्यंत सतर्कपणे त्यांना दोन ते अडीच तासात जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. आरोपी जेर बंद होईपर्यंत पोलीस अधीक्षक यांनी स्वतः रात्रभर सर्व परिस्थिती हाताळण्याबाबत मार्गदर्शन व सूचना देऊन सर्व परिस्थितीवर नियंत्रण ठेवले होते.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मनिष कलवानीया, अपर पोलीस अधीक्षक सुनिल लांजेवर, उपविभागीय पोलीस अधिकारी मुकुंद आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय लोहकरे, पोउपनि मनोज पाटील, पोउपनि रज्जाक शेख, सफौ / महादेव निकाळजे, सफी/विठ्ठल जाधव, पोलीस अंमलदार योगेश झाल्टे, भगवान सिंघल, प्रशांत गिते, विजय भोटकर, वाल्मीक बनगे, गोरक्ष सदगीर, नवनाथ केरे, नवनाथ निकम, ज्ञानेश्वर पाडळे, गणेश पैठणकर, मपोना/सिमा जाधव, तीन होमगार्ड यांच्या पथकाने केली आहे.