लोहा तालुक्यातील ६ गावांत प्लास्टिक कचरा मुक्त अभियानाला सुरुवात

नांदेड :  नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील  ६ गावांमध्ये कमल इंडिया फाउंडेशन यु.के, कमल उदवाडीया फाउंडेशन, ग्रामपंचायत निळा, आणि ईकोसत्व यांच्या संयुक्त विद्यमाने प्लास्टिक कचरा मुक्त अभियान राबविण्यात येत आहे.

      त्यानिमित्त १ जून २०२३ रोजी ग्रामपंचायत हरसद पासून घंटागाडी कचरा संकलनाला सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी हरसद ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, नागरिक, उपसरपंच, गावचे सरपंच पार्वतीबाई जामकर यांच्या हस्ते घंटागाडीचे उद्घाटन करण्यात आले. कमल इंडिया फाउंडेशन यु.के, कमल उदवाडीया फाउंडेशन, ग्रामपंचायत निळा, आणि ईकोसत्व यांच्या संयुक्त विद्यमाने गावात आदर्श घनकचरा व्यवस्थापन राबविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. या अनुषंगाने सुका कचरा संकलन करिता घंटागाडी गावात येणार आहे.

       इकोसत्व प्रतिनिधी संदेश घुले व भगवान गाडेकर यांनी नागरिकांना प्रकल्पाविषयी माहिती सांगितली.  नागरिकांना ओला आणि सुका कचऱ्याचे प्रत्यक्ष डेमो करून दाखवण्यात आले. कोणीही नागरिक सुका कचरा उघड्यावर, कुंड्यावर,  चुलीमध्ये जाळणार नाही. असे सांगण्यात आले असून नागरिकांचा कचरा घंटागाडी मध्ये घेण्यात आला. नागरिकांमध्ये सुका कचरा संकलन या संदर्भात मेगाफोन द्वारे जनजागृती करण्यात आली आहे. हरसद गाव स्वच्छतेच्या दिशेने वाटचाल करत आहे असे सरपंच यांनी यावेळी सांगितले. संघप्रमुख राहुल निकम यांनी सर्वांचे आभार प्रकट केले.

    यावेळी गावचे सरपंच, उपसरपंच,  ग्रामपंचायत  सदस्य, गावातील नागरिक  इकोसत्व प्रतिनिधी राहुल निकम,भगवान गाडेकर, संदेश घुले, अर्चन खुंडे, धनश्री, चालक विशाल, कर्मचारी योगीराज उपस्थिती होती.

       तसेच दिनांक २ जून २०२३ रोजी  पिंपळगाव येथे ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, गावचे सरपंच उमाजी गोरे, उपसरपंच दयानंद येवले सर्व सदस्य यांच्या हस्ते ग्रामपंचायत पिंपळगाव, कमल इंडिया फाउंडेशन यु.के, कमल उदवाडीया फाउंडेशन, ईकोसत्व यांच्या संयुक्त विद्यमाने गावात आदर्श घनकचरा व्यवस्थापन राबविण्यास सुरुवात करण्यात आली. या अनुषंगाने गावातील व तालुक्यातील प्रसिद्ध दैवत श्री. सिद्धी विनायक गणपती मंदिर परिसर येथून सुका कचरा संकलन करिता घंटागाडी सुरुवात करण्यात आली.

     यावेळी ग्रामपंचायत सदस्य, गावचे सरपंच उमाजी गोरे, उपसरपंच दयानंद येवले, सर्व सदस्य आरोग्य सखी अनिता येवले, अंगणवाडी सेविका पडमीनताई बासटवार, इकोसत्व प्रतिनिधी राहुल निकम, भगवान गाडेकर, अर्चना खुडे, धनश्री वच्चेवार, संदेश घुले घंटागाडी चालक विशाल लंगोटे , कर्मचारी योगीराज यांची उपस्थिती होती.