सोने कधीच गंजत नाही
"सोने कधीच गंजत नाही".... हे त्रिकलाबादी सत्य आहे की : सोने कधीच गंजत नाही, त्याचे मूल्य कमी हित नाही, ते नेहमीच आणि जगभर पिवळेधम्मक असते, अर्थात भुभागणुसर त्याची किंमत बदलू शकते पण रंग व चकाकी/झळाळी व महत्त्व मुळीच बदलत नाही आणि तर बाजारात मिरवून किंवा गाजावाजा करून खरेदी/विक्री करावे लागत नाही. ही तुलना मुळीच नाही, किंबहुना एक वास्तविक व व्यावहारिक उदाहरण आहे ज्यातून मूळ मुद्दा लक्षात येण्यास सहजता व्हावी. तर हे उदाहरण देण्याचा आणि या लेखप्रपंचाचा उद्देश फारच उदात्त पण साधा , सरळ व सोपा आहे.
इस्लाम धर्माविषयी कवडीचीही माहिती न घेता, धर्माशी निगडित बाबींना कालपरत्वे किंवा स्वार्थासाठी वापरून त्याचा विपर्यास करत समाजात गैरसमज पसरविणे, समाजात तेढ निर्माण करणे, मानवतेला काळीमा फासून एकूण समाजाचा सलोखा बिघडविण्याचे काम मोजके समाजकंटक राजरोसपणे करत आहेत.
कित्येक शतकांपासून स्वार्थ आणि निम्न स्तराच्या राजकारणाने धर्म या जनतेच्या भावनिक बाबीला हेरून त्याचा दुरुपयोग करून धार्मिक बाबीत वादावादी घडवून आणण्याचे षडयंत्र राबविणे आणि भिन्न धर्मात व समाजात तेढ निर्माण करण्याचे पत्की कऱ्य सुरू केले गेले. इस्लाम धर्म, त्याबाबत बळेच निर्माण केलेल्या दंतकथा आणि गैरसमज आदींबाबत सप्रमाण व प्रामाणिक विश्लेषण करण्याचा प्रयत्न आहे. तर सर्वप्रथम हे जाणून व समजून घेणे महत्त्वाचे की, इस्लाम हा धर्म मानवतेसोबत व मानावासारखे जगायला शिकवणाऱ्या आदर्श आचारसंहितेचे अस्सल रूप आहे. त्यामुळे इस्लाम धर्माची तुलना अन्य कश्याशीही होऊ शकत नाही. ही आदर्श आचारसंहिता परमकृपळू अल्लाहच्या लाडक्या प्रेषितांनी स्वतःच्या जीवनात तंतोतंत अवलंबून स्वतःच्या साथी, शिष्य, अनुयायी व समकालीन लोकांना जिवंत उदाहरणरूपाने सहज/सोपी पद्धत दिली. त्यामुळेच पैगंबर हजरत मुहम्मद (सल्लल्लाहू अलैही वसल्लम) यांच्या जीवनातील इस्लाम धर्माच्या शिकवनिंना अवलंबून तसे आचरण करणे हे आदर्श ठरते. त्यामुळेच तर इस्लाम धर्माचा वास्तव प्रतिनिधी अर्थात आरसा यारुपणे प्रथम क्रमांकावर पैगंबर हजरत मुहम्मद (सल्ललाहू अलैही वसल्लम) हे आहेत आणि त्यानंतर बाकी सर्व! अनादी काळापासून डोक्यावर टोपी, चेहऱ्यावर दाढी, अंगावर कुर्ता पायजमा असा पुरुषी पोशाख किंवा बुरखतील स्त्री बघितली आणि तो/ती काही चुकीचे आचरण/वर्तन करत असेल की फक्त त्याच्या/तिच्या ऐवजी सबंध मुसलमानांना अर्थात इस्लाम धर्माचा नाव ठेवणे सुरू, हे ओघाने घडतेय. अर्थात हे चुकीचे आहे, कारण इस्लाम धर्माचे वास्तव व महत्त्व हे अश्या कोण्या एका व्यक्तीच्या (तो/ती कितीही श्रेष्ठ असो वा कनिष्ठ, राजा/राणी असो वा रंक!) वागण्याबोलण्यावर अवलंबून मुळीच नाही आणि इस्लाम धर्माची शिकवण/आचारसंहिता ही समाजातील सर्व वर्गासाठी एकमेव व निष्पक्ष आहे, त्यात गरीब, श्रीमंत, स्त्री, पुरुष, लहान, मोठा, शिक्षित, अडाणी, इत्यादी वा तत्सम भेदभाव मुळीच नाही. पारदर्शकपणे नैतिक व न्याय्य जगण्यावर भर देणाऱ्या इस्लाम धर्माचे सदाचारात शेजारधर्म पाळण्यावर विशेष भर दिला आहे, तर आपले घर/परिसर स्वच्छ ठेवणे यास अत्यंत महत्त्वपूर्ण किंबहुना श्रद्धा/आस्थेचे निम्मे श्रेय दिले आहे आणि सत्य/निष्ठा/शांतता/मौन/संयम/क्षमा/निनिस्वार्थीपण आदी बाबींना चुका/पाप टाळण्याचे मुख्य स्त्रोत रूपाने महत्त्व दिले आहे. ही अल्पशी वैशिष्ट्ये इस्लाम धर्माच्या व्यापकतेची कल्पना देऊ शकत नाहीत, पण इस्लाम धर्माचा अनादर व तिरस्कार करणाऱ्यांच्या कपोलकल्पित आरोप (मांसाहारासाठी क्रूरता, दहशतवाद, अन्य धर्माचा द्वेष, अहंकारी/उन्माद असणारे, सत्तापिपासू, चंगळवादी-मौजमजा करण्यासाठी मान्यता देणारे) किती पोकळ आहेत हे स्वतः काळ आणि परिस्थितीच सप्रमाण उघड करते. इतके सारे घडत असूनही इस्लाम धर्माचे अमान्य केलेल्या अर्थात अनैतिक व निषिद्ध ठरविलेल्या बाबींचा उदो उदो करण्यात इस्लामविरोधी घटकांना मोठेपणा वाटत आहे, ज्याचे आपसूक होणारे दुष्परिणाम कालपरत्वे या समाजघातकी घटकांना भोगावे लागले/लागत आहेत आणि लागतील.
इस्लाम धर्मातील बुरखा परिधान करणारी स्त्री ही कैद नसून लज्जा या तिच्या अलांकराने झाकलेली आहे, ज्यात तिचे नैसर्गिक सौंदर्य हे अनमोल ठेवारूपाने आपसूक जपले जाते.
हजारो प्राणीमात्रातील मानव या एकमेव प्राण्यास अल्लाहने आपल्या निस्सीम कृपेचे वरदान असे जिव्हा/जीभ व बुद्धी दिली, तर काळाची घोर विडंबना आणि स्वयंघोषित समजदरीची विटंबना ती अशी की स्वतःला विद्वान व जाणे कोण कोण पदव्या/उपनाम/बिरुदावल्या म्हणविण्यांचे संशोधित म्हणणे असेही आहे की मानव आधी वानर होता, कालांतराने त्याचे रूपांतर मानवात झाले! यास सत्य समजून काही मानवप्राणी असेही सांगतात की इस्लाम धर्म तर इतक्यात आला/निर्माण झाला आहे, त्याआधी सर्व मानव हे एकच धर्मास मनात होते त्यामुळे सर्वांनी आपापले धर्म त्यागून कथित मूळ धर्मात यावे! पण असे म्हणणारे हे ही ग्राह्य धरतात की मानव आधी वानर होता! मग अजूनही बरीच वानर उरली कशी? आणि वानरांचा धर्म/भाषा/आचारसंहिता काय/कोणती असावी? कारण मूळ उत्पत्तिकडे जायचेच ठरविले तर मानवाच्या प्रगतीचे श्रेय घेणारे कथित मानव मग परतणार तरी कुठे? असे कथित प्रमाणबध्द संशोधनही तितकेच बेकार व मिथ्या आहे - जितके हे ही संशोधन की पृथ्वीव्यतिरिक्त अन्य ग्रहावरही जीवन आहे, म्हणजेच परग्रहवासी अस्तित्वात आहेत/असतात!
इस्लाम धर्माची मूळ शिकवण ही की, अल्लाह एकच आहे व तो विश्वविधाता आहे आणि त्याच्याशिवाय अन्य कोणीच/काहीच पूजनीय नाही आणि पैगंबर हजरत मुहम्मद (सल्लल्लाहू अलैही वसल्लम) हे अल्लाहचे प्रेषित आहेत.
इस्लाम धर्माचा उदय हा विश्वाच्या निर्मितीनंतर प्रथम स्त्री-पुरुषाला अर्थात हजरत आदम आणि हजरत हव्वा (अलैही सलाम) अल्लाहने जमिनीवर पाठविले. येथूनच मानवाचे जमिनीवरील वास्तव्य व जीवन आरंभले.
हा महितीवजा लेख कोणताही खुलासा नसून इस्लाम धर्माबद्दल द्वेष व मत्सरपोटी पसरविले जाणारे गैरसमज आणि बिनबुडाचे/तथ्यहीन आरोप याबाबत वास्तव माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. इस्लाम धर्माची शिकवण ही कुराण या धर्म ग्रंथावर आधारित आहे, जो दस्तुरखुद्द अल्लाहचा आदेश आहे. कुराण आणि पैगंबर हजरत मुहम्मद (सल्ललाहू अलैही वसल्लम) यांची आदर्श जीवनशैली याचा ज्या व्यक्तीने स्वीकार केला त्याचे भौतिक व ऐहिक जीवन सफल होते.
इस्लाम धर्मात चुका/त्रुटी शोधून सापडत नाही आणि इस्लाम धर्माला वास्तवात समजणारी व्यक्ती इस्लाम धर्माचा स्वीकार करते, तरीही बरेच बदनाम करण्याच्या उद्देशाने पछाडलेले लोक बिनबुडाचे आरोप करतात किंवा इस्लाम धर्माशी निगडित बाबींना चुकीचा अर्थ व संदर्भ देऊन जगासमोर मांडतात. जसे दहशतवाद, जिहाद, स्त्री पुरुष असमानता, इत्यादी.
इस्लाम धर्म दहशतवाद किंवा तत्सम अवगुनांना मुळीच थारा देत नाही. किंबहुना खोटे बोलणे या आजकाल क्षुल्लक समजणाऱ्या बाबीला इस्लाम धर्माचे पापांचे मूळ ठरविले आहे, मग दहशतवादाला कोणत्याही स्वरूपात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे थारा देणे अशक्य आहे हे उघड सत्य आहे.
जिहाद या अरबी भाषेतील शब्दाचा अर्थ युद्ध असा होतो आणि इस्लाम धर्माच्या सर्व अनुयायांनी हे युद्ध करणे क्रमप्राप्त आहे. हे युद्ध याचा अर्थ शस्त्र-अस्त्रांनी काढले जाणारे युद्ध नव्हे तर काम, क्रोध, मोह, मया, मत्सर असे सारे अवगुण झुगारून सदाचार अंगीकृत असलेले जीवन जगणे होय. आणि लव जिहाद ही कपोलकल्पित बाब बळेच निर्माण केलेली आहे, कारण युद्ध स्वतःशी असो किंवा त्रासदायक शत्रूशी - तिथे प्रेम व युद्ध हे परस्परविरोधी तत्व शब्द्रुपणे एकत्र आणून मिर्विण्याचे धोरण राबविण्याची कीव करावीशी वाटते.
इस्लाम धर्मात पुरुषाला कुटुंबप्रमुखाचे स्थान तर स्त्रीला सर्वश्रेष्ठ दर्जा देण्यात आला आहे. याचे थोडक्यात विश्लेषण ते असे की,आईच्या पायाखाली स्वर्ग आहे, तर वडील स्वर्गाचे प्रवेशद्वार आहेत, अशी आईवडिलांची महती इस्लाम धर्म विषद करतो, त्यात असमानता किंवा दूजाभाव कुठेच नाही.
एका लेखातून किंवा सर्वतोपरी पराकाष्ठा करून जगातील सर्वात मोठे लिखाण केले तर इस्लाम धर्माविषयी कुराण जे व जसे परखडपणे आणि सहजतेने मांडतो, तसे मानवाने मांडणे अशक्य आहे. करिता इस्लाम धर्मात वास्तवात समजून घेत कुराण आणि पैगंबर हजरत मुहम्मद (सल्ललाहू अलैही वसल्लम) यांचे जीवन समजणे अत्यावश्यक आहे. अन्यथा टोपी, दाढी, कुर्ता पायजमा, नाव, बुरखा आदी भौतिक बाबींना ग्राह्य धरून काहीबाही बोलणे सोपे आहे - पण या भौतिक बाबी किंवा फक्त यांच्यासह जगणारी व्यक्ती इस्लामचे प्रतिनिधित्व करत नाहीत.
इस्लाम धर्म हा मानवतावादी, सर्वसमावेशक, नैतिकतेसच प्राधान्य देणारा, शांतता व आदर्श जीवनशैलीचा पुरस्कार करणारा, जीवनाच्या प्रत्येक क्षणात परिपूर्ण मार्गदर्शन करणारा, संपूर्णतः सकारात्मक असा धर्म आहे - जी एक परिपूर्ण व आदर्श व विकसित जीवनशैली आहे.
- इकबाल सईद काझी
(विश्लेषक/लेखक), औरंगाबाद.