अबब ! १४ कोटी फक्त दुरुस्तीसाठी; नविन बिल्डींग बांधली अस्ती इतक्या रकमेत !!

अबब ! १४ कोटी फक्त दुरुस्तीसाठी; नविन बिल्डींग बांधली अस्ती इतक्या रकमेत !!

औरंगाबाद : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय औरंगाबाद (घाटी) संस्थेच्या वस्तीगृह, बाह्यरुग्णविभाग व शल्यचिकित्साशास्त्र विभाग इमारतीचे मजबूतीकरण व नूतनीकरण करणेसाठी वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने १४,६७,००,०००/- (अक्षरी रुपये चौदा कोटी, सदुसष्ट लक्ष) रकमेच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता दिल्याने खासदार इम्तियाज जलील यांनी आश्चर्य व्यक्त करत नविन बिल्डींग बांधली अस्ती इतक्या रकमेत अशी खोचक टिका सुध्दा केली.

          मराठवाड्यातील सर्वसामान्य रुग्णांना खाजगी रुग्णालयात सदरील उपचार घेणे आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याने त्यांची अवस्था अत्यंत दयनीय होवून आर्थिक, मानसिक व शारीरिक त्रास सोसावा लागत असल्याने रुग्णांना दर्जेदार सुविधा मिळाव्या यासाठी शासनाकडून कोट्यावधीचा निधी दिला जातो. परंतु निधीची मंजुरी करत असतांना शासनाला सादर करण्यात आलेल्या अंदाजपत्रकाची शहानिशा करणे गरजेचे आहे; शहानिशा न करताच फक्त काही जणांना आर्थिक फायदा पोहोचविण्याचे उद्देशाने निधीची मंजुरी केल्याचे समजते. दुरुस्तीच्या सर्व कामांची चौकशी होणे गरजेचे असल्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी म्हटले आहे.

          शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे रुग्णसेवेसाठी शासनाकडून कोट्यावधीचा निधी व यंत्रणा उपलब्ध करुन दिली जाते. एवढ्या निधीत संपुर्ण नविन इमारतीचे बांधकाम होवू शकते परंतु घाटी प्रशासनाच्या हलगर्जी व निष्क्रियतेपणाच्या कारभारामुळे विविध आजाराने ग्रस्त रुग्णांना सोयीसुविधा मिळत नसल्याने त्यांना उपचारासाठी महागडे खाजगी रुग्णालयात जावे लागते हे दुर्देव असल्याचे खासदार इम्तियाज जलील म्हटले.