अयोध्येला जाण्यापुर्वी राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिली तंबी ; म्हणाले....

अयोध्येला जाण्यापुर्वी राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिली तंबी ; म्हणाले....

मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदींवरील भोंग्यांविरोधात आक्रमक भूमिका घेत राज्यासह देशातील राजकारणात देखील खळबळ उडवून दिली. राज ठाकरे यांनी त्यांचा अयोध्या दौरा जाहीर केल्यानंतर या दौऱ्याबाबत राजकीय वर्तु्ळात चर्चा सुरू झाली आहे.

राज ठाकरे हे 5 जून रोजी पक्षाच्या नेत्यांसह अयोध्येला जाणार आहेत. राज ठाकरेंना अयोध्या दौरा यशस्वी करायचा असून या दौऱ्याबाबत कोणीही माध्यमांशी बोलू नये, अशी तंबी राज ठाकरेंनी मनसे (MNS) पदाधिकाऱ्यांना दिली आहे. राज ठाकरेंनी याबाबतची सूचना सोशल मीडियावर प्रसिद्ध केली आहे.

माझ्या अयोध्या दौऱ्याबाबत पक्षातीली कुणीही प्रसार माध्यमांशी बोलू नये. पक्षाने प्रवक्ते नेमलेले आहेत. ते याबाबत बोलतील. इतर कुणीही याबाबत बोलण्याचा शहाणपणा करू नये, अशी सक्त ताकीद राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिली आहे.

दरम्यान, इतरही कोणत्याही विषयात पदाधिकारी अथवा कोणीही बोलू नये. ज्यांना जी जबाबदारी दिली आहे, त्यांनीही जबाबदारीने बोलावे व भान राखावे, अशा सूचनाही राज ठाकरेंनी दिल्या आहेत. तर जे लिहिलंय ते पक्षातील सर्वांनी अत्यंत गांभीर्याने घ्यावे, असंही राज ठाकरेंनी पत्रकात नमूद केलं आहे.

https://twitter.com/RajThackeray/status/1522977259828969472?s=20&t=T0byp7o7fNPGNuTlE1gVWA