पिओ बियर, करो सरकार को चिअर : विधान परिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे!

पिओ बियर, करो सरकार को चिअर : विधान परिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे!

औरंगाबाद, २२ ऑक्टोबर: महाराष्ट्रात बियरची कमी विक्री का होते याचा अभ्यास करून महाराष्ट्रात बियर विक्री वाढवण्यासाठी काय करता येईल यासाठी महाराष्ट्र सरकारने पाच IAS अधिकाऱ्यांची समिती नेमली आहे. 

        या समितीमध्ये बियर असोसिएशनच्या एका प्रतिनिधींचाही समावेश केला आहे.

       मराठी शाळा वाचवल्या पाहिजेत यासाठी यांना समिती गठित करण्याची आवश्यकता भासू नये हेच दुर्दैव आहे महाराष्ट्राचे...!

       रेशनवर बियर वाटली तर घरोघरी दारू पिणारे तयार होतील. आमच्या साधू संतांनी केलेल्या प्रबोधनावर, गाडगे बाबांनी केलेल्या व्यसनमुक्ती प्रबोधनावर बियर ओतनार वाटतं सरकार...

        जनता आंधळी कोशिंबीर खेळण्यात व्यस्त असल्याने सरकार बिनधास्त समाज विघातक निर्णय घेण्याची हिंमत करू लागले आहे.

       "पिओ बियर....करो सरकार को चिअर"
अशी फेसबुक पोस्ट विधान परिषद विरोधी पक्ष नेता आमदार अंबादास दानवे यांनी करून राज्य शासनावर ताशेरे ओढले आहे.