शिवरत्न वीर जिवाजी महाले यांना अभिवादन

शिवरत्न वीर जिवाजी महाले यांना अभिवादन

औरंगाबाद : (प्रतिनिधी) छत्रपती शिवाजी महाराज यांचे अंगरक्षक शिवरत्न विर जीवाजी महाले यांची ३८६ वी जयंती साजरी करण्यात आली.

त्यानिमित्त जीवाजी महाले यांच्या पुतळ्यास शिवसेना नेतेेमाजी खासदार  चंद्रकांत खैरे यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी माजी महापौर त्र्यंबक तुपे, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, ऍड. आशुतोष डंख, माजी नगरसेवक सचिन खैरे, युवासेना काॅलेज कक्षाधिकारी ऋषिकेश जैस्वाल, शाखाप्रमुख रमेश ‌सुर्यवंशी, मनोहर वनकर, सुशिल बोरडे, नवनाथ घोडके, रत्नाकर वरपे, सचिन गायकवाड, काशिनाथ भालेराव, नितीन मोहिते, सनी पारसवार, ज्ञानदीप जाधव, संजय पंडित, गणेश वैद्य आदी उपस्थित होते.