वंचितचे धरणे आंदोलन : कापसाला डबल भाव द्या, G-20 प्रतिनिधींसमोर सोमवारी निदर्शने :

वंचितचे धरणे आंदोलन : कापसाला डबल भाव द्या, G-20 प्रतिनिधींसमोर सोमवारी निदर्शने :

औरंगाबाद : आज दिनांक २४ फेब्रुवारी २०२३ रोजी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली,  रेखाताई ठाकूर प्रदेश अध्यक्ष यांच्या सूचनेनुसार, वंचित बहुजन महिला आघाडी प्रदेश महासचिव तथा औरंगाबाद जिल्हा प्रभारी  अरुंधतीताई शिरसाठ यांच्या नेतृत्वाखाली, मराठवाडा अध्यक्ष  अशोक हिंगे पाटील यांच्या आदेशाने शेतकऱ्यांच्या कापसाला दुप्पट म्हणजे सरकारने 6000 रू. प्रति क्विंटल कापूस भाव केला आहे त्यास 12000/- रू. प्रति क्विंटल हमीभाव करण्यात यावा आणि घरघुती वीज बिलात करण्यात आलेली अतिरिक्त वाढ रद्द करण्यात यावी या महत्वाच्या विषयावर जिल्हाधिकारी कार्यालय, औरंगाबाद येथे धरणे आंदोलन करण्यात आले. 

     काही दिवसांपूर्वी औरंगाबाद जिल्हाधिकारी यांनी सर्व पक्षीय प्रतिनिधी (जिल्हाध्यक्ष) यांना होणाऱ्या G -20 (जी-२०) कालावधीत पक्षीय आंदोलन, मोर्चा, उपोषण करण्यात येऊ नये बाबत बैठकीचे आयोजन केले होते. सदरील बैठकीत एकमताने जिल्हाधिकारी यांच्या सूचना मान्य करण्यात आल्या. परंतु वंचित बहुजन आघाडीच्या कुठल्याही प्रतिनिधी यांना निमंत्रित करण्यात आले नव्हते. म्हणून प्रशासन आम्हाला विरोधी पक्ष समजून आंदोलन/उपोषण/मोर्चा करण्यासाठी "मुक-संमती" देत आहे, असे निवासी सहाय्यक जिल्हाधिकारी यांना सांगितले. त्यावेळी निवासी सहाय्यक जिल्हाधिकारी यांनी प्रशासनाची चूक झाली त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. परंतु पक्ष प्रतिनिधी यांनी विदेशी राजदुतांच्या उपस्थितीत दिनांक 27 फेब्रुवारी रोजी निदर्शने करण्याबाबत कल्पना दिली आहे. असे वंचित बहुजन आघाडी ने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे .

     निवेदन देते वेळी वंचित बहुजन आघाडी औरंगाबाद पश्चिम जिल्हाध्यक्ष योगेश गुलाबराव बन, पूर्व जिल्हाध्यक्ष प्रभाकर बकले, युवक जिल्हाध्यक्ष सतीश गायकवाड, महिला जिल्हाध्यक्षा लता बामणे, महासचिव पंकज बनसोडे, मिलिंद बोर्डे, संघराज धम्मकीर्ती, भैयासाहेब जाधव, उपाध्यक्ष रवी तायडे, अब्दुल समद, गणेश खोतकर, बाबा पटेल, अशोक कानडे, पी के दाभाडे, सुलोचना साबळे, भगवान खिल्लारे, सलीम सिद्दीकी आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.