हिमायत बागेत तरुणाची निर्घृण हत्या

हिमायत बागेत तरुणाची निर्घृण हत्या

औरंगाबाद, दि. 16 : आज दुपारी हिमायत बागेत लाकडी दरवाजाचे सौरक्षण भिंतीजवळ एका तरुणाचे रक्ताच्या थारोळ्यात प्रीत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. कृष्णा शेषराव जाधव वय 22 वर्ष राहणार सुभाष चंद्र बोस नगर टीव्ही सेंटर हडको 11 औरंगाबाद अशी मयत तरुणाची ओळख पटली. अज्ञात कारणाने अज्ञात व्यक्तीने धारधार शस्त्राने मृतकाचा गळा चिरुन, कपाळावर, दोन्ही हातावर, दोन्ही हाताच्या पोटऱ्यावर, बरगड्यावर, गंभीर जखमा करुन खून केला. याबाबतची तक्रार मृतकाचे वडील शेषराव गोविंदराव जाधव यांनी पोलीस स्टेशन बेगमपुरा येथे तक्रार दिल्याने अपराध क्रमांक 479/2021 कलम 302 भारतीय दंड विधान अन्वये अज्ञात व्यक्तीची विरुद्ध सायंकाळी 7 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास पोउपनि बोडखे करीत आहे.