खंडणीतील परमबीर सिंगाचा वाटा 75% आणि सचिन वाझेचा 25% : मुंबई पोलिसांचे दोषारोप पत्र

खंडणीतील परमबीर सिंगाचा वाटा 75% आणि सचिन वाझेचा 25% : मुंबई पोलिसांचे दोषारोप पत्र

मुंबई पोलिसांनी शनिवारी कोर्टात सादर केलेल्या दोषारोप पत्रामध्ये नमूद केले आहे की वसूल करण्यात आलेल्या खंडणीतील मुंबईचा माजी पोलीस कमिशनर खंडणीखोर परमबीर सिंग याचा 75% वाटा होता आणि खाकीतील आतंकवादी व खंडणीखोर सचिन वाजेचा 25% वाटा होता.

दोषारोप पत्रातील अनेक साक्षीदारांच्या जबाबातून असे निष्पन्न होत आहे की हॉटेल मालक, बार मालक आणि सट्टाबूकीज़ कडून खंडणी वसूल करणाऱ्या गॅंगचा मुखीया आरोपी नंबर 1 मुंबईचा माजी पोलीस कमिशनर परमविर सिंह होता.

शनिवारी कोर्टात सादर करण्यात आलेले दोषारोप बिल्डर तथा हॉटेल मालक विमल अग्रवाल यांच्या तक्रारीवरून दाखल गुन्ह्या संबंधी आहे. त्यात त्यांनी व्हाट्सअप च्या 69 रेकॉर्डिंग सादर केल्या होत्या. त्याचे दोन वाईन बार आणि रेस्टॉरंटमध्ये रेड न करण्यासाठी त्यांचेकडून जानेवारी 2021 आणि मार्च 2021 दरम्यान खंडणी वसूल करण्यात आल्याचे आरोप करण्यात आले होते.

मुंबई क्राईम ब्रांच नी केलेल्या तपासात असे निष्पन्न झाले आहे की, सचिन वाझे नी आगस्ट आणि डिसेंबर 2020 मध्ये सट्टाबुकीज़, हॉटेल आणि बार मालकांसोबत मीटिंगा घेतल्या होत्या. पहिली मीटिंग क्राईम ब्रांचच्या युनिट XI मध्ये घेण्यात आली होती. 

दोषारोपपत्रामधील एक साक्षीदार मानव नायक म्हणतो की, त्याला सट्ट्याच्या खोट्या गुन्ह्यात अडकविण्यात आले होते आणि त्यातून सुटका करण्यासाठी दोन कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती, नंतर अग्रवाल यांच्या मध्यस्थीमुळे 35 लाख रुपये खंडणी देण्यात आली होती. सचिन वाझेनी अग्रवाल यांना सांगितले होते की त्याचेवर सीपी साहेब परमवीर सिंगाचा दबाव आहे.  

साक्षीदार नारायण मुंदडा यांच्या जबाबात नमूद आहे की ऑगस्ट महिन्यात झालेल्या मिटिंग मध्ये सचिन वाझेनी सांगितले होते की, या खंडणीच्या वसूल केलेल्या रकमेतील 75% परमवीर सिंग साठी आणि 25% त्याच्या म्हणजे सचिन वाझेसाठी आहे. अशा प्रकारच्या मीटिंगा सचिन वाझेनी घेतल्याचे पोलीस अंमलदारांच्या जबाबात सुद्धा आले आहे. 

पोलीस कॉन्स्टेबल राजू माने यांनी दिलेल्या जबाबात नमूद केली आहे की सचिन वाझे आणि परमवीर सिंग यांच्यात नेहमी संभाषण व्हायचे आणि त्यावरून सचिन वाझे लोकांवर आणि पोलीस अंमलदारांवर दबाव टाकत असायचा आणि धमक्या देत असायचा.

एका पोलीस आमदाराच्या जबाबात असेही नमूद आहे की, सचिन वाझे नोकरीवर रुजू झाल्यानंतर आणि क्राईम इन्वेस्टीगेशन युनिटचा (CIU) मुखिया झाल्या-झाल्या त्याने हाताखालील पोलीस अंमलदारांना मुंबई शहरातील  बार, हॉटेल्स आणि अवैध धंद्यांबाबत ची माहिती गोळा करण्यास फर्मावले होते. या साक्षीदारांनी आपले जबाबात असेही नमूद केले की, लॉकडाऊन मध्ये सूट मिळाल्याबरोबर  'नंबर एक साहेबांसाठी' बार आणि हॉटेल मालकांकडून वाझेनी खंडणी वसुली सुरू केली होती.  त्याला नंतर समजले की, सचिन वाझे हा पोलीस कमिशनर परमबीर सिंगचा 'नंबर एक' म्हणून उल्लेख करायचा.

एक साक्षीदार BCB हॉटेलचे अनिकेत पाटील यांनी आपल्या जबाबात सांगितले की या गुन्ह्यातील आरोपी सुमित सिंग, विनय सिंग आणि रियाज भट्टी त्याचे हॉटेलमध्ये आले होते आणि त्यांनी स्वतःला सचिन वाझे आणि परमबीर सिंग ची माणसे असल्याचा परिचय देत हॉटेल बंद करण्याची धमकी दिली होती. त्यावेळी त्यांनी दोन महिन्याचे हप्त्याची रक्कम तीन लाख रुपये आणि बक्षीस म्हणून दोन लाख रुपये अशी एकूण पाच लाख रुपयाची रक्कम खंडणी म्हणून त्यांना दिली होती.

मुंबई पोलिसांनी सादर केलेल्या दोषारोप पत्रांमधील अनेक साक्षीदारांचे जबाब कलम 164 क्रिमिनल प्रोसीजर कोड प्रमाणे घेण्यात आले असून त्यांची व्हिडिओग्राफी पण करण्यात आलेली आहे. भारतीय दंड विधानाच्या कलम 384, 385, 388, 389, 201, 120B आणि 34 नुसार हे दोषारोपपत्र या खाकीतील खंडणी बहाद्दरांचे विरुद्ध  दाखल करण्यात आलेले आहे.