सिगारेट गोडाऊन वरील दरोड्याचा पोलिसांनी लावला एका दिवसात छडा : ५४ लाखाचा माल जप्त

अकोला, ,२४ जून (जिल्हा प्रतिनिधी मोतेबर देशमुख) : अकोला जिल्ह्यात पोलीस स्टेशन डाबकी रोड हद्दीतील राधास्वामी सत्संगचे बाजुला असलेले मनोहर मोटवाणी यांचे सिगरेटचे गोडावूनवर दि. २२/०६/ २०२३ रोजी रात्री ০२/०০ वा. दरम्यान चौकीदार यांचे बळजबरीने हातपाय बांधून गोडावूनचे शटर वाकवून गोडावून मध्ये २१,০০,০০০/- रु चा मुद्देमाल अज्ञात ३ चोरटयांनी जबरी ने चोरून नेल्या बाबत पो. स्टे. डाबकी रोड येथे २२/o६/२०२३ रोजी अप क्र. १३३/२०२३ कलम ३९२,३४ भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात अला होता.
पोलीस अधीक्षक संदीप घुगे व अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे अकोला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक संतोष महल्ले व स्थानिक गुन्हे शाखा, अकोला येथील अधिकारी व कर्मचारी यांना जबरी चोरी गुन्हा उघडकीस आनणेबाबत सुचना दिल्या होत्या. त्यानुसार दिनांक २३/०६ / २०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, अकोला यांना गुप्त बातमीदारा कडुन माहीती मिळाली की, पोलीस स्टेशन डाबकी रोड अकोला हृददीतील नंदलाल मोटवाणी यांचे राधास्वामी संत्सग जवळील गोडावुन चे दोन चौकीदार यांचे जबरीने हातपाय बांधुन गोडावुन चे शटर तोडून गोडावुन मध्ये असलेला ।TC विविध कंपनीची सिगरेट जबरीने चोरून नेणाऱ्या तिन आरोपींपैकी एक आरोपी आतीश सुनील मलीये, रा. गौसीया मस्जिद गुलजार पुरा अकोला हा आहे. वरून त्याचा शोध घेवुन त्यास ताब्यात घेवुन विश्वासात घेवुन कौशल्यपुर्वक बारकाईने विचारपुस केली असता त्याने त्याचे मीत्रांचे सोबत नंदलाल मोटवाणी याचे राधास्वामी संत्सग जवळील गोडावून चे दोन चौकीदारांचे जबरीने हातपाय बांधुन गोडावुन चे शटर तोडुन गोडावुन मध्ये असलेला ।TC विविध कंपनीची सिगरेट जबरीने चोरुन नेली बाबत कबुली दिली.
सदर गुन्हयात १) आतीश सुनिल मलीये वय २५ वर्ष धंदा. ड्रायव्हींग, रा. गौसीया मज्जीद गुलझारपुरा अकोला २) भावेश गजानन भिरड वय २५ वर्ष धंदा. खाजगी नोकरी रा. गायत्री नगर जुनेशहर अकोला ३) शाम सुखदेव ताथोड, वय २३ वर्ष धंदा, मजुरी, रा. गायत्री नगर जुनेशहर अकोला ४) नागेश विजय कुटाफळे, वय २० वर्ष धंदा मजूरी रा. शिवचरण पेठ, जुने शहर अकोला यांना ताब्यात घेवुन त्याचे कडुन विविध ITC कंपनीचे सिगारेट कीमंत एकुण ४३७७८५०/- दोन चारचाकी मालवाहू वाहन की अं. ८,००,০০০/-रु, दोन मोटार सायकल की अं. २.००.००० /-रू, ४ विविध कंपनीचे मोबाईल की अं. ४०,০০০/-रू, दोन चाकू कीं. अं ३००/-रू एकुण ५४,१८,१५० /- रू. चा मुुद्देमाल आरोपितांकडून जप्त करण्यात आला. पुढील तपास कामी पो. स्टे. डाबकी रोड येथे देण्यात आले.
सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक सदिप घुगे, अपर पोलीस अधीक्षक, अभय डोंगरे यांचे मार्गदर्शना खाली पो.नि. संतोष महल्ले, स्थानिक गुन्हे शाखा, सपोनि गोपाल ढोले, पोलीस अंमलदार फीरोज खान, खुशाल नेमाडे, आकाश मानकर, अभीपेक पाठक, धिरज वानखेडे, चालक हेमंत दापरवार यांनी केली.