जनसुरक्षा विधेयकावर महाविकास आघाडीचा आक्रमक पवित्रा – राज्यपालांकडे थेट धाव

जनसुरक्षा विधेयकावर महाविकास आघाडीचा आक्रमक पवित्रा – राज्यपालांकडे थेट धाव

मुंबई, १८ जुलै– सध्या राज्यात सुरू असलेल्या राजकारणावर महाविकास आघाडीनं जोरदार पवित्रा घेतला आहे. आज आघाडीचे मुख्य नेते थेट राजभवनात जाऊन राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांना भेटले आणि दोन महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपली भूमिका मांडली.

       पहिला मुद्दा होता ‘महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक’. हे नवीन विधेयक लोकांच्या भावना लक्षात न घेता आणलं गेलं आहे, असं महाविकास आघाडीचं म्हणणं आहे. त्यांनी राज्यपालांना विनंती केली की, हे विधेयक मंजूर करू नये आणि सरकारकडे परत पाठवावं.

       दुसरा मुद्दा विधानभवनात सत्ताधाऱ्यांकडून काही अट्टल गुन्हेगारांना घेऊन येण्याचा होता. अशा लोकांचा वापर करून विरोधकांवर दबाव टाकला जातोय, असं आघाडीने सांगितलं. त्यामुळे अशा लोकांचं सदस्यत्व तात्काळ रद्द करावं, अशी मागणीही त्यांनी केली.

       राज्यपालांनी  हे दोन्ही मुद्दे गांभीर्यानं घ्यावेत आणि योग्य ती कारवाई करावी, अशी अपेक्षा महाविकास आघाडीने व्यक्त केली.

        या भेटीत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार जयंत पाटील, विजय वडेट्टीवार, असलम शेख, जितेंद्र आव्हाड, डॉ. नितीन राऊत, नाना पटोले, सतेज बंटी पाटील, अमीन पटेल आणि साजिद पठाण आदी नेते उपस्थित होते.