औरंगाबादमध्ये लाल झेंडा फडकला! शेकडो रिक्षाचालक समाजवादी पक्षात

औरंगाबादमध्ये लाल झेंडा फडकला! शेकडो रिक्षाचालक समाजवादी पक्षात

संभाजीनगर औरंगाबाद दिनांक २५ नोव्हेंबर: औरंगाबाद येथे समाजवादी पक्षाच्या वतीने आयोजित विशेष कार्यक्रमात शहरातील शेकडो ऑटो-रिक्शा चालकांनी पक्षात प्रवेश करून पक्षाची ताकद भक्कम केली. हा कार्यक्रम जिल्हा व महानगर अध्यक्ष शेख अय्यूब पटेल यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडला.

       या कार्यक्रमात समाजवादी पक्षाच्या ऑटो-रिक्शा सेल, औरंगाबाद अध्यक्षपदी सय्यद अकबर सय्यद बक्षो यांची अधिकृतरित्या नियुक्ती जाहीर करण्यात आली. नव्या जबाबदारीमुळे रिक्षा चालकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून संघटन अधिक मजबूत करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगण्यात आले.

        कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रदेश सचिव संजीव भाऊ इखारे, जिल्हा महिला अध्यक्षा शाहीन पठाण, महापालिका महिला अध्यक्षा सीमा मांडविया, औरंगाबाद पूर्व विधानसभा अध्यक्ष अजमत खान, महानगर उपाध्यक्ष मोहसिन शेख, महानगर सचिव इलियास शेख, सलाम खान, सय्यद जुनैद तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

        शेकडो रिक्षा सेलचे कार्यकर्ते समाजवादी पक्षात दाखल झाल्याने पक्षाला नवचैतन्य, नवीन ऊर्जासंचार आणि संघटन विस्ताराला वेग मिळणार असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. शहरातील सामान्य श्रमिक वर्ग पक्षाशी जोडला जात असल्याने आगामी काळात पक्षाची पकड अधिक मजबूत होईल, असा विश्वासही पदाधिकाऱ्यांनी दर्शविला.