भाजपाची नवी प्रदेश कार्यकारिणी जाहीर : मराठवाड्यातील तिघे उपाध्यक्ष

भाजपाची नवी प्रदेश कार्यकारिणी जाहीर : मराठवाड्यातील तिघे उपाध्यक्ष

मुंबई : भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी पक्षाची नवीन प्रदेश कार्यकारिणी जाहीर केली आहे.  या नव्या कार्यकारणीत एकूण १६ जणांना उपाध्यक्षपदी नियुक्त करण्यात आले असून  मराठवाड्यातील तिघांना उपाध्यक्षपदे देण्यात आली आहे.  त्यात भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष एजाज देशमुख यांचा समावेश आहे.

नवीन प्रदेश उपाध्यक्षांची नावे अशी;

मराठवाडा विभाग
एजाज देशमुख, अजित माधवराव गोपछडे आणि गजानन विठ्ठलराव घुगे.

विदर्भ विभाग
चैनसुख मदनलाल संचेती, संजय दत्तूजी भेंडे आणि धर्मपाल नथुजी मेश्राम.

पश्चिम महाराष्ट्र
सुरेश गणपती हळवणकर, संजय विश्वनाथराव भेगडे, अमर शंकर साबळे, राजेश बाबुलाल पांडे आणि विक्रम विनायक पावसकर.

कोकण विभाग
माधव जनार्दन भंडारी आणि अतुल सुधाकर काळचेकर.

उत्तर महाराष्ट्र
राजेंद्र गावित आणि श्रीमती स्मिता उदय वाघ.

मुंबई विभाग
जयप्रकाश चंद्रबली ठाकूर