VIDEO : पोलिसांनो सावधान ; सुप्रीम कोर्ट म्हणते - गुन्हा दाखल नसताना पोलिसांनी बोलावणे बेकायदा...
ज्या माणसाचे विरुद्ध कोणत्याही पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल नाही अशा व्यक्तीला पोलिसांनी चौकशीसाठी, समुपदेशनासाठी, इंटेरोगेशन साठी पोलीस ठाण्यात किंवा अन्य कोणत्याही ठिकाणी बोलावणे हे गैर कायदेशीर आहे. असे करणे सुप्रीम कोर्टाने या संबंधाने अर्नेश कुमार विरुद्ध बिहार सरकार चे प्रकरणात सन 2014 मध्ये दिलेल्या एका आदेशाच्या मूलभूत तत्त्वाचे उल्लंघन आहे. अशाच एका प्रकरणात एका पोलिस अधिकाऱ्याला सुप्रीम कोर्टाने न्यायालयाचे आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी 15 दिवसाची कैद सुनावली आहे.