धर्माच्या नावावर अधर्म: भागवतजींच्या उपदेशांचा प्रभाव कुठे?

गुस्ताखी माफ
भागवतजी, फक्त उपदेश देऊन चालणार नाही!!अमलबाजवणी साठी पाबंद करा! तरच सदभावना, नसता तुमची "नौटंकी" ठरेल..!! धर्माच्या नावानेच अधर्म केव्हां पर्यंत?
संघाचे प्रमुख मोहीम भागवत यांनी सगरमच्या नावाने अधर्म करणाऱ्यांना चांगलाच धडा दिला. "प्रत्येक दिवस एक नवीन प्रकरण उकरण्यात येत आहे, काही लोक असं करून हिंदूनेता होण्याचे स्वप्न पाहत आहे. आता मात्र याची परवानगी देता येणार नाही. अनेक दशकापासून देशात अनेक समाजाचे लोक सदभावनेने राहत आहे. अल्पसंख्यांक व बहुसंख्याक यांची पूजा अर्चना वेगवेगळी, मात्र आपण वर्षानुवर्षे एकत्र राहतो. इतर धर्मियांच्या श्रद्धेचा सन्मान केला जावा, धर्माचा अर्धा ज्ञान असल्यास अत्याचार होतो. पूर्वजांच्या अतिरेक कारवाया मुळे आपण ही तसंच वागायला हवं, हे स्वीकार्य नाही." आता बोला एक कुटुंब प्रमुख हिंदू संघटना व राजकीय नेत्यांना सद्भावणेचा डोस देत आहे. जगाच्या पटलावर देशाची प्रतिमा खराब होण्याचा धोका असल्याचा इशारा देत आहे. भागवत किती ही सज्जनपणे बोलत असेल तर देशात त्यांच्या भावनांना खरच कदर आहे काय? दोन दिवसा नंतरच यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना भागवतांच्या संदेशाचा विसर पडतो. ते मंदिर खोजो अभियानाचे समर्थन करत आगीत तेल ओतण्याचे काम करत आहेत. दुसरीकडे जगतगुरु भट्टचार्य सांगतात, "भागवत यांच्यात दुरदर्शीपणा नाही, ते हिंदूंचे नेते नाहीत". आता बोंब मारा....!!
मोहन भागवत हे नेहमी हिंदू अतिवाद्यांच्या भूमिकेवर सडेतोड टीका करतात. २०१७-१८ साली ही त्यांनी मुस्लिमां विरोधात होत असलेल्या मॉबलिंचिंग प्रकरणी डीएनए एकच असल्याचे सांगितले. राममंदिर प्रकरणी आता हे प्रकरण इथेच थांबवायला हवं, अशी भूमिका घेतली. ते मशिदीत जाऊन ही आले. प्रत्येक मशिदी खाली शिवलिंग शोधणं, हे देश हिताचे नसल्याचेही ते सांगतात. २०२२साली ही त्यांनी अल्पसंख्यांक हे देशातील नागरिक व प्रत्येकाच्या पूजा-अर्चनेचा सन्मान केला पाहिजे असे सांगतात. भागवत हे समस्त हिंदू सनातन धर्माचे प्रमुख आहेत. त्यांचे प्रत्येक वाक्य हे अधोरेखित केले जाते. त्यांचा सम्मान केला जातो.दुर्दैवाने त्यांच्या भूमिकेला हिंदू अतिवाद्यांच्या कट्टर मानसिकते मुळे बगल दिली जात आहे. राजकारणी, धर्मगुरू व संघाचे काही घटक,कोर्टाला ही जुमानत नसल्याचे चित्र आहे. आता बघा ना...जगतगुरु राजभद्राचार सांगतात, "भागवत हे शासक नाही, त्यांचे विचार दूरदर्शी नाही", शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वर म्हणतात, "हिंदू गौरवसाठी पौराणिक सर्वे व्हायला पाहिजे". धंदेबाज गुरु बाबा रामदेव तर पुढे जाऊन, "सनातन धर्म नष्ट करणाऱ्यांना धडा शिकवायला हवा..!" आता हजार वर्षांपूर्वी जे मुस्लिम शासक होते, त्यांचा बदला आज हे मुसलमानां कडून घेण्याच्या बेतात आहेत. आता या बाबा लोकांना कोण सांगेल, मौर्य शासका नंतर हजारो बौद्ध मंदिरे तुडवून सनातन मंदिर झालीत, मग काय बौद्ध समाजाने मंदिर खोदोची मागणी करायला हवी का? म्हणूनच भागवत यांचे वक्तव्य "धर्माचं अर्धे ज्ञान हे विनाशकारी, अतिरेक माजविणारे असते, "जगाचा इतिहास ही तोच आहे. म्हणून भागवत हे जागतिक स्तरावर सर्वमान्य आहे.
संवैधानिक पदावर बसलेले योगी तर देशातील हिंदू कट्टरवाद्यांच्या गळ्यातील ताईत झालेत. मोदी नंतर पंतप्रधान होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या त्यांच्या उत्तरप्रदेशात काय अवस्था आहे. प्रत्येक जिल्ह्यात "मंदिर खोजो" अभियान सुरू आहेत. अत्यंत मागासलेल्या यूपीत मंदिर खोजो मूळे बेरोजगारी दूर होणार आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न,गतिमान विकास होणार आहेत. या व्यवस्थेला लाज वाटायला पाहिजे, आज अर्धी मुंबई यूपीच्या भैयांनी भरलेली आहे.का? तर तेथे लोक दडभद्री जीवन जगताहेत. दुर्दैवाने धर्माच्या अफीमच्या गोळीने यूपी बरबटलेले राज्य झाले आहे.तेथे कोणीच कॉर्पोरेट गुंतवणूक करायला तयार नाही.वैश्विक स्तरावर यूपीच्या धर्माध राजकीय,प्रशासकीय यंत्रणा मुळे देशाची बदनामी होत आहे.
दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुस्लिम राष्ट्र कुवैतला जाऊन आले. तेथील राजे शेख तमीम बिन हमद थानी यांची गळाभेट घेतली. भारत-कुवैत मैत्री, व्यापार व तंत्रज्ञानावर करार करण्यात आला.तसेच मोदींना कुवेतचा सर्वोच्च नागरी पुरस्कार "मुबारक अल ऑर्डर"ने सन्मानित करण्यात आले. एका बलाढ्य मुस्लिम देशात पंतप्रधानांचा राजेशाही थाट सुरू असताना मात्र भारतात मशिदी खाली शिवलिंग शोधण्याचे काम योगी प्रशासन करत होते. हे सर्व मुस्लिम राष्ट्रांना माहीत नाही असं ही नाही. भारतात मुस्लिमांना धमकावणे, त्यांच्या विरोधात फुत्कार मेडिया कडून वेगवेगळ्या जिहादचे आरोप करून त्यांना राजकीय, आर्थिक व सामाजिक रित्या वेगळे पाडण्याचे कुभांड सुरू आहेत. जेव्हा पंतप्रधान म्हणून मानमोहनसिग व राष्ट्रपती म्हणून अबुल कलाम होते तेव्हा अतिवाद्यांनी कोणतेच जिहाद, मशिदी खाली शिवलिंग असल्याच्या बोंबा मारल्या नाही किंवा "हिंदू खतरे मे" चा बागलबुवा केला नाही.मात्र देशात संघप्रिय सत्ता असतांना देश विघातक, विषारी कृत्यांना बळी पडला आहे. एका महंत ने तर चक्क मोहन भगवंतांच्या वक्तव्य नंतर त्यांना जिहादी मानसिकता या न्यूनगंड विचारांनी नावाजले. वाईट वाटतंय...!दुसरीकडे भाजप गोत्यात अडकली तरी मोदी निशब्द आहेत....! विषारी प्रवृत्तींना खतपाणी कोणी घालताहेत?हे जगजाहीर आहे. आता मोहन भागवत सारख्या वडीलढाऱ्यांनाही धर्माच्या नावाने अधर्म करणारे जुमानत नाही...दुर्दैव आहे.
लेखक : अशफाक शेख,वरिष्ठ पत्रकार, औरंगाबाद.