तू निरपराध होता हे शब्द ऐकण्यासाठी कमल अन्सारी तू जिवंत नाही
गेल्या महिन्यात मुंबई 2006 साखळी बॉम्बस्फोटाचा निकाल आला. त्यामध्ये असलेले सर्व 13 आरोपींना न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. त्यातील एक आरोपी जे नागपूर या ठिकाणी शिक्षा भोगत होते. तुरुंगात असताना कोविडच्या काळात त्याचे निधन झाले होते.
आज 31/08/2025 रोजी नागपूर येथे बेगुनाह कैदी पुस्तकाचे लेखक डॉ. अब्दुल वाहिद शेख व परिवारचे लोकांनी त्याच्या कबरीवर भेट दिली.
न्यायालयाने दिलेल्या निकालाची प्रतचा वाचन करून त्याच्या कबरीला फुले वाहत श्रद्धांजली दिली. निकालचे प्रत त्याच्या कबरी वर ठेवत परिवारच्या लोकांनी सांगितले की;
"तू बेगुनाह था ये शब्द सुनने के लिए तुम आज जीवित नही हो. कमल अंसारी काश तू जिंदा रहता"
न्याय मिळाला, पण किंमत चुकवली आयुष्याची!
नागपूरच्या जरीपटका कब्रस्तानातल्या त्या थंडगार मातीखाली, एका निष्पाप माणसाचं आयुष्य कायमचं शांत झालं होतं. त्या कबरीच्या बाजूला उभं राहून, त्यांच्या मुलाने न्यायाधीशांनी दिलेला निकाल वाचला. कागदावर कोरलेलं ते प्रत्येक अक्षर, 'निर्दोष' हा शब्द त्यांच्या कानांवर आदळत होता, पण त्याचा अर्थ समजून घेण्यासाठी आज कमल अहमद अन्सारी हयात नव्हते. हा निर्णय त्यांच्या निर्दोषत्वाचा पुरावा होता, पण तो स्वीकारायला आज ते हयात नव्हते. सोळा वर्षांपूर्वी, 'दहशतवादी' म्हणून शिक्का मारला गेलेला तो माणूस, आज मरणोत्तर सन्मानित होत होता.
एक क्षण विचार करा, कशासाठी? ज्या न्यायासाठी त्यांनी १६ वर्षे तुरुंगात काढली, ज्यासाठी त्यांच्या कुटुंबाने अपमान सहन केला, तो न्याय त्यांना त्यांच्या कबरीवर मिळाला. हा न्याय नाही, हा तर निर्दोषत्वाचा थट्टा आहे!
कमल अहमद… बिहारच्या मधुबनी येथे राहणारा एक सामान्य माणूस. त्यांच्यावर लावलेले आरोप, तुरुंगात भोगलेल्या यातना… ही फक्त एका माणसाची कथा नाही. ही आपल्या न्यायव्यवस्थेच्या दिरंगाईची आणि तिच्या कमकुवतपणाची कहाणी आहे. त्यांची मुलं वडिलांच्या प्रेमाशिवाय मोठी झाली, त्यांची पत्नी रोज समाजाने फेकलेल्या प्रश्नांना उत्तरं देत राहिली. त्यांच्या आई-वडिलांनी आपल्या मुलाला अपराधी म्हणून पाहिलं गेलं, हे दु:ख घेऊनच जगाचा निरोप घेतला. या सगळ्या जखमांवर मलम लावण्यासाठी कोणता न्याय पुरेसा ठरू शकेल?
२०१९ साली, जेव्हा जग एका अदृश्य शत्रूशी लढत होतं, तेव्हा बिहार येथील कमल अहमद अन्सारी न्याय मिळवण्यासाठी शेवटचा श्वास घेत होते. नागपूर तुरुंगाच्या कोठडीत, ते एकटे नव्हते. त्यांच्यासोबत होत्या त्यांच्या मुलांची आठवण, पत्नीच्या डोळ्यातील अश्रू आणि समाजाने दिलेल्या अपमानाचा सल. न्याय मिळण्यापूर्वीच त्यांच्या आयुष्याचा अंत झाला.
आज त्या कबरीवरून एकच प्रश्न विचारला जातोय: 'या न्यायाचा काय उपयोग? जो वेळेवर मिळालाच नाही.' हा न्याय त्या कुटुंबाला त्यांची गेलेली प्रतिष्ठा परत देऊ शकत नाही. त्यांच्या मुलांच्या चेहऱ्यावरचं हसू परत आणू शकत नाही. ज्याला वेळेवर न्याय मिळत नाही, त्याचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास पूर्णपणे डळमळतो.
कमाल अहमद अन्सारी यांची कबर ही केवळ मातीचा ढिगारा नाही. ती प्रत्येक निर्दोष व्यक्तीच्या शांत झालेल्या आक्रोशाची कहाणी आहे. ही कहाणी आपल्याला सांगते की, न्याय जर वेळेवर आणि योग्य वेळी मिळाला नाही, तर त्याचे कोणतेही मोल नसते.
परमेश्वर, अल्लाह, ईश्वर कमाल अहमद अन्सारी यांचे आत्मेला शांती द्यावी हीच प्रार्थना.
अंजुम इनामदार
अध्यक्ष: मूलनिवासी मुस्लिम मंच.
पुणे. 9028402814