एकाच दिवशी शहरातील दोन लाचखोर पोलीस सब इन्स्पेक्टरांना बेड्या

एकाच दिवशी शहरातील दोन लाचखोर पोलीस सब इन्स्पेक्टरांना बेड्या
Corrupt PSI Sasane and Morey

औरंगाबाद : पोलीस स्टेशनमध्ये दाखल तक्रारीत आरोपींना मदत करण्यासाठी लाच घेताना दोन लाचखोर पोलीस सब इंस्पेक्टर ना एंटी करप्शन ब्युरोचे अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले. या दोन्ही कारवाया एकाच दिवशी 25 मे रोजी सिडको आणि सातारा पोलीस स्टेशनच्या हद्दीत करण्यात आल्या. विशेष म्हणजे या दोन्ही लाचखोर पोलीस सबमिस्पेक्टर ना नुकतीच पोलीस सब इंस्पेक्टर म्हणून बढती मिळाली होती.

     सिडको पोलीस स्टेशनच्या लाचखोर सब इंस्पेक्टर चे नाव नितीन दशरथ मोरे असून सातारा पोलीस स्टेशनच्या लाजखोर सबी स्पेक्टर चे नाव मच्छिंद्र बापूराव ससाणे आहे.

     अँटी करप्शन ब्युरो कडून मिळालेल्या माहितीनुसार एका तक्रारदाराविरोधात सातारा पोलीस स्टेशन मध्ये भारतीय दंड विधानाचे कलम 498 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. तक्रारदारासह त्यांचे आई-वडील बहिण पत्नी असे एकूण सहा जण या गुन्ह्यात आरोपी होते. दरम्यान या गुन्ह्याचा तपास हा लाचखोर पोलीस डबीस्पेक्टर ससाने कडे देण्यात आला होता. या गुन्ह्यात मदत करण्यासाठी लाचखोर मच्छिंदर ससाणे या पोलीस सबमिस्पेक्टरने तक्रारदाराकडे 25 मे रोजी 24 हजार रुपयांची लाचेची मागणी केली. तक्रारदारास लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने अँटीकरप्शन ब्युरो कडे धाव घेतली आणि आपले घराणे मांडले. अँटी करप्शन विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांचे तक्रारीची पडताळणी केली असता लाचखोराने लाच मागितल्याची खात्री पटली. अँटी करप्शन ब्युरो चे अधिकाऱ्यांनी सापडा रचून संताजी पोलीस चौकी जवळ तक्रारदाराकडून चोवीस हजार रुपयाची लाच घेताना लाजखोर पोलीस सब इन्स्पेक्टर मच्छिंद्र ससाणे यास पकडले.

       सिडको पोलीस स्टेशनच्या प्रकरणात लाचखोर पोलीस सब इन्स्पेक्टर नितीन मोरे याचे कडे तक्रारदारा विरोधात एक अप्लिकेशन इन्क्वायरी होती. त्या आपलिकेशन इन्क्वायरीनुसार तक्रारदारांचे विरुद्ध गुन्हा दाखल न करण्यासाठी या लाचखोर पोलीस सेक्टर नितीन मोरे यांनी तक्रारदाराकडून यापूर्वी वीस हजार रुपये लाच म्हणून घेतले होते. त्यानंतर पुन्हा बारा हजार रुपये लाच म्हणून मागितले. वारंवार लाचेची मागणी या लाचखोर पोलीस सब इन्स्पेक्टर कडून होत असल्याने तक्रारदार कंटाळला. आता पुन्हा लाच देण्याची त्यांची इच्छा नसल्याने त्यांनी कार्यालय गाठले.  आणि आपली तक्रार नोंदविली. अँटी करप्शन ब्युरो चे अधिकाऱ्यांनी सापळा रचून 25 मे रोजी सिडको पोलीस स्टेशनचे पाठीमागे असलेल्या एका रसवंती जवळ लाचखोर पोलीस सब इंस्पेक्टर नितीन मोरे याला तक्रारदाराकडून बारा हजार रुपयाची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले.

         दोन्ही लाचखोर पोलीस सब इन्स्पेक्टरांचे विरुद्ध त्यांच्याच पोलीस ठाण्यात रात्री लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हे दोन्ही सापळे औरंगाबाद अँटी करप्शन ब्युरो चे पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विशाल खांबे, पोलीस उपअधीक्षक मारुती पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस इन्स्पेक्टर संदीप राजपूत आणि पोलीस निरीक्षक हनुमंत वारे यांनी आपले सहकारी साईनाथ तोडकर, राजेंद्र सिनकर, विलास चव्हाण, केवलसिंग घुसिंगे, बाळासाहेब राठोड, दत्तात्रय होरकटे यांच्यासह रचले.