अकोट ते पुणे जाणाऱ्या लक्झरी बसचा अपघात : २९ प्रवासी जखमी ४ प्रवासी ठार झाल्याची भीती.
अकोला, ३० जून (जिल्हा प्रतिनिधि-मोतेबर देशमुख): आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार आकोट ते पुणे जाणाऱ्या लक्झरी बसचा अकोट-शेगांव मुख्य रस्त्या दरम्यान हनवाडी फाट्या जवळ सायंकाळी साडेसात वाजताचे सुमारास पलटी झाल्याने अपघात झाला. या अपघातात ४ प्रवासी ठार झाले असल्याची भीती व्यक्त केली जात असून २९ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना अकोला येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आलेले आहे.
ड्रायव्हरला बस चालवताना हार्ट अटॅक आल्या मुळे ड्रायव्हरचा बस वरील ताबा सुटला आणि बस बाजूच्या शेतात जाऊन पलटी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.