ए. एस. क्लब चौकातील सदोष ट्रॅफिक सिग्नल : वाहन चालकांना भुर्दंड
औरंगाबाद, (प्रतिनिधी): तिसगाव हद्दीतील ए.एस. क्लब चौकात असलेल्या सदोष ट्रॅफिक सिग्नल मध्ये सुधारणा करून चुकीची दंडात्मक कारवाई थांबविण्यात यावी या बाबत दिलीप गांगुर्डे, पोलिस निरीक्षक, वाहतूक शाखा, सिडको वाळूजमहानगर-१ तिसगाव यांना सिडको वाळूजमहानगर बचाव कृती समितीच्या वतिने अध्यक्ष नागेश कुठारे यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदन देण्यात आले.
आपल्या निवेदनात त्यांनी सांगितले की, सिडको वाळूजमहानगर वाहतुक शाखे अंतर्गत तिसगाव हद्दीतील ए.एस.क्लब तसेच ओएसिस चौक (पंढरपूर) चौकात वाहतूक सुरूळीत व्हावी म्हणून सिग्नल बसविण्यात आले आहे.
या सिग्नलची तिसगाव चौकातून पैठण लिंक रोड कडे जाताना तसेच पैठण लिंक रोड वरून तिसगाव कडे जातांना चे सिग्नल ची वेळ (Duration) फक्त १५ सेकंद आहे. तसेच नगर कडून औरंगाबादकडे जाताना सिग्नल संपल्यावर पुलाची लांबी जास्त असल्यामुळे वाहन दिलेल्या वेळेत पास होत नाही. दरम्यान वेळ कमी असल्याने शहरातून येणारे उद्योजक, कामगार यांना बऱ्याचदा आर्थिक भुर्दंड बसला असून यावर काहींनी आवाजही उठवला आहे. या ठिकाणी दोघांची नेमणूक असतांना जास्त पोलिस या ठिकाणी येऊन दंडात्मक कार्यवाही जास्त करून आर्थिक दंड कायदेशीर तसेच बेकायदेशीर जमा करत असल्याची नागरिकांकडून तक्रार प्राप्त होत आहे. या बाबत यापूर्वी आपणांस फोन वर तसेच आपल्या वाहतूक पोलीस यांना प्रत्यक्ष स्थळावर दाखवून दिले होते. मात्र यात आजपर्यंत सुधारणा करण्यात आली नाही. या ठिकाणावरून औद्योगिक क्षेत्रातील कामगार व कर्मचाऱ्यांची तसेच परिसरातील रांजणगाव, वडगाव-बजाजनगर, पंढरपूर, तिसगाव व ईतर गावातील लाखो ची संख्या असल्यामुळे वाहतूक करणारी वाहणे जास्त आहेत. या रहिवाशांना या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. किंबहुना या तांत्रिक बाबी मुळे आपल्या कडून विनाकारण दंड, कायदेशीर व बेकायदेशीर आकारण्यात येतो, तो भरावा लागत असुन मानसिक तसेच आर्थिक बाबींचा सामना करावा लागत आहे.
तसेच सिडको वाळूजमहानगर-१ गोविंद हिल्स येथे या पर्वी गतिरोधक होते मात्र रस्ते दुरूस्ती च्या वेळेस ते जागतिक बँक प्रकल्प यांच्याकडून काढण्यात आले आहे. ते टाकण्यात यावे यासाठी पाठपुरावा केला असता आपली परवानगीची मागणी करत आहेत.
तसेच ओएसिस चौक (पंढरपूर) चौकात नगर कडे जाणारे वाहनास सतत (Continuously)पुढे नगर कडे जाण्यासाठी आपल्या विभागाकडून बॅरिकेट लावले आहेत. मात्र त्या ठिकाणचा रस्ता ठिक नसल्यामुळे सतत वाहतूक कोंडी होत आहे. तरी आपण या बाबत संबंधित विभागास परवानगी द्यावी तसेच रस्ता दुरूस्तीसाठी पत्र द्यावे. तरी आपण या सर्व गोष्टींचा विचार करून योग्य त्या उपाययोजना करावे. आशी मागणी केली असता या बाबत जागतिक बँक प्रकल्प, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, तसेच सिडको प्रशासनास आवश्यक मागणी तसेच रस्ते दुरूस्तीसह ईतर आपल्या मागणी संदर्भात लेखी पत्र देऊन सिग्नल मध्ये आवश्यक बदल करण्याचा आश्वासन श्री गांगुर्डे साहेब यांनी दिले शिष्टमंडळात नागेश कुठारे-उपसरपंच तिसगाव तथा अध्यक्ष सिडको वाळूजमहानगर बचाव कृती समिती, कृष्णा गायकवाड ग्रामपंचायत सदस्य तिसगाव, उपाध्यक्ष व उद्यौजक नरेंद्रसिंग यादव, सुदाम जाधव, नितीन वावरे, माणिक कुलकर्णी, अतुल सारंगधर, अनिकेत गाजरे, किरण गावंडे, कृष्णा वाघ आदी उपस्थित होते.