आंतरराष्ट्रीय महिला दिन : लिंगपिसाट धर्मगुरू चे समर्थनार्थ भारतात महीलांचा मोर्चा
नांदेड : अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्या प्रकरणी तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगगत असलेल्या लिंगपिसाट हिंदू धर्मगुरू आसाराम बापू चे समर्थनार्थ महिला दिनाचे औचित्य साधत नांदेडमध्ये महिला उत्थान मंडळाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला..
या मोर्च्यात मोठ्या संख्येने महिलांनी सहभाग नोंदविला. लिंगपिसाट हिंदू धर्मगुरू आसाराम बापूची तुरुंगातून सुटका करण्यात यावी अशी मागणी या महिलांनी केली.
एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचे आरोप सिद्ध झाल्याने लिंगपिसाट आसाराम बापू सध्या तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगगत आहे. त्याचेवरील आरोफ खोटे असल्याचे आणि षड्यंत्र रचून त्याला फसविण्यात आले असल्याचे या महिलांचे म्हणणं आहे.