एलर्जी, दमा, श्वासोश्वास, टीबी व फुफुसाचे आजारांसाठी तपासणी शिबिराचे आयोजन
औरंगाबाद दिनांक 29 ऑक्टोबर : ॲलर्जी; वारंवार शिंका येणे नाकातून पाणी जाणे नाकाला खाज येणे,
दम लागणे, नाक बंद होणे डोळ्यातून पाणी जाणे कोरडा खोकला येणे डोळ्याला खाज येणे रात्री खोकल्यामुळे झोपेतून उठणे कानामध्ये खाज येणे, बालदमा, लहान मुलांची एलर्जी, टीबी, इत्यादी आजारावर तपासणी, पॅच टेस्ट, फुप्फुसांची तपासणी दुर्बिणीद्वारे श्वासनलिकेची तपासणी, मार्गदर्शन व सल्ला साठी दिनांक 31/10/2021 रोजी सकाळी 10:30 वाजेपासून दुपारी 2 वाजेपर्यंत शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
ही तपासणी विश्व प्रसिद्ध क्रिश्चियन मेडिकल कॉलेज, वेल्लोर (तामिळनाडू) येथून इंटरनॅशनल अस्थमा सर्विसेसचे आणि अमेरिकन अकॅडमी ऑफ एलर्जी, अस्थमा ऐंड इम्मुनोलॉजी येथून मान्यताप्राप्त एलर्जी आणि अस्थमा कोर्स केलेले, ॲलर्जी, दमा, टीबी रोग तज्ञ डॉक्टर जहीर शाह MBBS, TDD(Chest Medicine), Diploma in Allergy & Asthma ही रुबी एलर्जी, अस्थमा ऐंड चेस्ट क्लीनिक
शहा बाजार औरंगाबाद येथे करणार आहेत. गरजुंनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आयोजकांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे आवाहन केले आहे.