कासवछाप बुलढाणा पोलीस : गुन्हा दाखल होऊन १७ दिवस उलटले अजून पंचनामा नाही
खामगाव : दिनांक 8 एप्रिल 2023 रोजी खामगाव शहर पोलीस स्टेशनला उपरोक्त व्हिडिओमध्ये दाखवलेल्या बातमीनुसार अज्ञात दोन आरोपींविरुद्ध गुन्हा क्रमांक 179/2023 कलम 420, 34 भारतीय दंड विधान नुसार दाखल करण्यात आलेला आहे.
गुन्हा दाखल झाल्याबरोबर फिर्यादीने दाखवलेल्या घटनास्थळाचा पंचनामा करणे कायद्यान्वये बंधनकारक आहे. यासाठी गुन्हा दाखल झाल्याबरोबर तपासी अंमलदार फिर्यादीशी कॉन्टॅक्ट करतो आणि त्यांनी दाखवलेल्या घटनास्थळाचा कमीत कमी दोन पंचांग समक्ष पंचनामा करतो. आणि नंतर आपल्या परीने तपासालास सुरुवात करतो.
आज 25 एप्रिल 2023 रोजी आमच्या प्रतिनिधींनी फिर्यादीची संपर्क साधून घटनेबाबतची सविस्तर माहिती घेतली असता त्यांनी वरील व्हिडिओमध्ये दाखवलेल्या परिस्थितीनुसार घटनेचे वर्णन केले. त्यांना या प्रकरणाच्या प्रगती बाबत विचारणा केली, पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर तुमच्याशी संपर्क साजला होता का असे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की अद्याप पोलिसांनी आणि त्याची संपर्क साधलेला नाही . आम्ही आश्चर्य नेत्यांना हे पण विचारणा केली की पोलिसांनी अद्याप पंचनामे साठी सुद्धा तुम्हाला बोलवले नाही का? त्यावर त्यांचे नकारात्मक उत्तर होते.
यासंबंधी आम्ही खामगाव शहर पोलिसांची टेलिफोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता टेलिफोनची घंटी वाजत होती परंतु कोणीही फोन उचललेला नाही त्यामुळे पोलिसांशी संपर्क झालेला नाही.
एक गंभीर गुन्हा बुलढाणा पोलिसात नोंद होतो. परंतु 17 दिवस उलटूनही साधा पंचनामा सुद्धा पोलिसांकडून करण्यात येत नाही. तपासाची प्रगती काय असेल? याबाबत आश्चर्य व्यक्त केला जात आहे.