एस टी डेपो मॅनेजरसह एक कंडक्टर अँटी करप्शनच्या जाळ्यात : कंडक्टरला मागितली होती 35000 रुपये ची लाच

एस टी डेपो मॅनेजरसह एक कंडक्टर अँटी करप्शनच्या जाळ्यात : कंडक्टरला मागितली होती 35000 रुपये ची लाच
Buldana ST Depot Manager Santosh Wanere

बुलढाणा, २२ ऑगस्ट (प्रतिनिधी-उमेेर देशमुख) : पंढरपूर यात्रा दरम्यान बस मध्ये स्वयंपाक करण्याचा एक व्हीडिओ व्हायरल झाला होता. या प्रकारणी बुलढाणा विभाग नियंत्रक यांनी कंडक्टर प्रदीप भास्कर सरकटे यांचे विरुद्ध चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश बुलढाणा डेपो मॅनेजर संतोष वानेरे याला दिले होते.

     विभाग नियंत्रक यांच्याकडे कसुरी अहवाल न पाठवण्यासाठी लाचखोर बुलढाणा डेपो मॅनेजर  संतोष वानेरे याने कंडक्टर महादेव सावरकर यांच्या मार्फतीने कंडक्टर प्रदीप सरकटे यांचेकडे 35 हजार रुपय लाचेची मागणी केली होती. त्यापैकी 28 हजार रुपयाची लाच अगोदरच देण्यात आली होती. उरलेले सात हजार रुपय लाचेची रक्कम देण्यासाठी लाचखोर डेपो मॅनेजर नी तकादा लावला होता. 

     कंडक्टर प्रदीप सरकटे यांना पुन्हा सात हजार रुपयाची लाचेची रक्कम देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी बुलढाणा एंटी करप्शन ब्युरोचे कार्यालय गाठले. तिथे तक्रार दिली. 

       बुलढाणा अँटी करप्शन चे पोलीस उपाधीक्षक श्रीमती शितल घोगरे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह सापळा रचून बुलढाणा खामगाव रोड वरील तुकाराम पतसंस्थे समोर लाचखोर डेपो मॅनेजर संतोष वानेरे आणि कंडक्टर महादेव सावरकर यांना रंगेहात पकडले. 

      या दोघा लाचखोरांचे विरुद्ध बुलढाणा पोलीस स्टेशन येथे लाचलुपत प्रतिबंधक कायद्याचे कलम 7A सह कलम 12 नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.