तलाठी भरती परीक्षेला दोन तास उशीर : आईएएस अधिकाऱ्याकडून दिलगिरी व्यक्त

तलाठी भरती परीक्षेला दोन तास उशीर : आईएएस अधिकाऱ्याकडून दिलगिरी व्यक्त

दिनांक १७ ऑगस्ट पासून महाराष्ट्र राज्यात तलाठी भरती परीक्षा सुरू झाली असून दररोज तीन सत्रा मध्ये परीक्षा केंद्रावर परीक्षा घेतली जात आहे. ही परीक्षा घेण्यासाठी शासनाने टीसीएस कंपनीला प्राधिकृत केले आहे. टीसीएस कंपनीच्या सर्वर मध्ये बिघाड झाल्याने आज सकाळी नऊ वाजता सुरू होणारी परीक्षा दोन तास उशिराने सुरू झाली. परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना झालेल्या दिरंगाई व मनस्तापाबद्दल राज्य परिक्षा समन्वयक तलाठी भरती परिक्षा-२०२३ तथा अप्पर जमाबंदी आयुक्त आणि अतिरक्त संचालक भूमी अभिलेख (महाराष्ट्र राज्य) पुणे आनंद रायते (आईएएस) यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.

      आनंद रायते आईएएस यांनी यासंबंधी कळविले की; तलाठी भरती परीक्षा २०२३ दिनांक २१/०८/२०२३ रोजी राज्यातील ३० जिल्हे व ११५ टीसीएस केंद्रावरती नियोजीत करणेत आली होती. सदर परिक्षेच्या वेळापत्रकानुसार सकाळी पहिले सत्र ९.०० ते ११.०० नियोजीत करणेत आले होते, तथापी टीसीएस कंपनीच्या डेटा सेंटर सर्वर मध्ये तांत्रिक बिघाड झालेने सदरचे सत्र वेळेनुसार सुरु करणेस अडचण निर्माण झाली.

      यासंदर्भात टीसीएस कंपनीकड़ून राज्य समन्वय कार्यालयास परिक्षा उशीरा सुरु होणेबाबत कळविष्यात आले. टीसीएस कंपनी व त्यांचे डेटा सेंटर यांनी सर्वं देशभरातील परिक्षासंदर्भातील हा तांत्रिक बिघाड़ झाला असल्याने वरिष्ठ वैज्ञानिक यांच्या स्तरावर याबाबत युध्द पातळीवर हा तांत्रिक बिघाड शोधून परिक्षा ११.०० वाजता सर्व केंद्रवार सुरु करणेबाबत कळविणेत आले. 

     राज्य समन्वयक यांनी सर्व निवासी उप जिल्हाधिकारी यांचेशी संपर्क करुन प्रथम सत्रातील विद्याथ्र्याना नियोजीत परिक्षा उशीरा सुरु हाईल असे कळविणेत आले. त्याप्रमाणे सर्व परिक्षाकेंद्रांवरील परिक्षार्थीना याची सुचना देण्यात आली.

       टीसीएस कंपनीकडून तांत्रिक बिघाड़ दूर करणेत येवून राज्यातील सर्व ११५ केंद्रावर परिक्षा सुरु करणेबाबत सुचना मिळाल्यानंतर सर्व परिक्षा केंद्रातील अधिकान्यांना याबाबत सुचित करणेत येवुन परिक्षेसाठी आलेल्या विद्याथ्योंना परिक्षा केंद्रात प्रवेश देण्यात आला. राज्यातील सर्व ११५ केंद्रावर ११.०० वाजता परिक्षा सुरु करणेत आली.

      राज्यातील सर्व तलाठी भरतीसाठी अर्ज केलेल्या विद्याथ्थ्थोंना टीसीएस कंपनीच्या तांत्रिक बिघाडामुळे आज होणाऱ्या तीनही सत्रातील परिक्षा नियोजीत वेळेपेक्षा दोन तास उशिरा सुरु झाल्या. त्याप्रमाणे बदलेल्या वेळेबाबत सर्व परिक्षा केंद्रावर सूुचना प्रसारित करणेची कार्यवाही निवासी उपजिल्हाधिकारी यांचे मार्फत परिक्षा केंद्राना देण्यात आल्या. सर्व परिक्षार्थीना नियोजीत दोन तासांचा वेळ परिक्षेसाठो देण्यात आला.

       त्याचप्रमाणे दिव्यांग परिक्षार्थी यांना आजचे सत्र दोन मध्ये अतिरिक्त देय असणारा वेळ देण्यात आला. 

       त्यांनी पुढे असेही नमूद केले की, दि. २२/०८/२०२३ रोजी तीनही सत्रातील उमेदवारांनी प्रवेशपत्रावर नमूद केलेल्या विहित वेळत परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे.