पोलीस स्टेशन इन्चार्ज लाचखोर महिला पोलीस निरीक्षकासह तिचा सहकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

पोलीस स्टेशन इन्चार्ज लाचखोर महिला पोलीस निरीक्षकासह तिचा सहकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

औरंगाबाद : महिन्याला एक केस आणि २५०००/- रुपयाचा हप्ता मागणाऱ्या औरंगाबाद पोलीस आयुक्तालयातील दौलताबाद पोलीस स्टेशनची इन्चार्ज लाचखोर महिला पोलीस निरीक्षक सुनिता मिसाळ सह तिचा सहकारी लाचखोर हवलदार रणजीत सिरसाठ औरंगाबाद अँटी करप्शन युरो च्या जाळ्यात अडकले आहे.
     अँटी करप्शन ब्युरो कडून मिळालेल्या माहितीनुसार अवैध गुटखा व्यापाऱ्यास पोलीस स्टेशन दौलताबाद हद्दीत गुटख्याचा धंदा करण्यासाठी लाचखोर पोलीस निरीक्षक सुनिता मिसाळ आणि तिचा लाचखोर सहकारी रणजीत सिरसाठ यांनी दर महिन्याला एक केस आणि हप्ता म्हणून २५०००/- रुपयांची मागणी केली होती. याबाबतची तक्रार गुटखा व्यापाऱ्यांनी औरंगाबाद अँटी करप्शन ब्युरो कडे दिनांक २४ मार्च २०२२ रोजी केली होती. 
     या तक्रारीची अँटी करप्शन ब्युरो कडून सत्यता पडताळण्यात आली. तडजोडी अंती दर महिन्याला एक केस आणि लाचखोर महिला पोलीस निरीक्षक सुनिता मिसाळ साठी दरमहा हप्ता १००००/- रुपये आणि लाचखोर पोलीस हवालदार रणजीत सिरसाठ साठी २०००/- रुपये असे एकूण १२०००/- रुपये दरमहा हप्त्याचे ठरले.
     आज औरंगाबाद शहरात लाचेची रक्कम स्वीकारतांना लाचखोर पोलीस हवलदार रणजीत सिरसाठ याला गुटका व्यापाऱ्याकडून १२०००/- रुपये स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. दोन्ही लाचखोरांचे विरुद्ध पोलीस स्टेशन दौलताबाद येथे लाचलुचपत प्रतिबंधक कायदा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.