वहदत ए इस्लामी च्या वतीने बालकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर
औरंगाबाद : (प्रतिनिधी) इस्लामी महीना रबिऊल अव्वल मध्ये इस्लामचे पैगंबर हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांचा जन्म झाला होता. यानिमित्ताने वहदत-ए-इस्लामी च्या वतीने आज जलाल कॉलनीत बालकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. त्यात परिसरातील 120 बालकांची आरोग्य तपासणी औरंगाबाद येथील बाल रोग तज्ञ डॉक्टर मोहम्मद सादिक (आरिफ चिल्ड्रन हॉस्पिटल) यांनी त्यांच्या टीम सह केली. आहार आणि न्यूट्रिशन संबंधी बालकांचे पालकांना माहिती दिली. बालकांना मोफत औषधीचे, विटामिन आणि टॉनिक चे वाटप करण्यात आले. दातांचे आरोग्यासाठी टूथपेस्ट आणि ब्रश चे वाटप करण्यात आले.
बालकांची मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे सफल आयोजनासाठी डॉक्टर मोहम्मद अबरार आरिफ, अब्दुल मतीन, अब्दुल करीम, अल्ताफ खान, यासर सिद्दीक़ी, ग़फ्फार हाशमी यांचेसह इतर सदस्यांनी परिश्रम घेतले.