'उद्धवजी'... हा खरा बाळासाहेबांचा बाणा! एकतर्फी प्रेमाचा एसिड हल्ला परतावाच लागेल..!!

'उद्धवजी'... हा खरा बाळासाहेबांचा बाणा! एकतर्फी प्रेमाचा एसिड हल्ला परतावाच लागेल..!!
Uddhav Thackeray

"मर्दा सारखे समोरून लढा....ईडीच्या मागे का लपता...."  'हिंदुत्वाला खरा धोका उपटसुंभ नवहिंदुत्ववाद्या कडून...सत्ता मिळाली नाही म्हणून तुम्ही चिरक्या, मुसंडया मारा, डोकी फुटली मात्र तडा जाणार नाही, माझा वाडा चिरेबंदी आहे... केवळ तुमची पालखी वहात नाही म्हणून शिवसैनिक भ्रष्ट झाला का? तुमची पालखी वाहणारे आम्ही भोई नाहीत...'  देशाला स्वातंत्र्य मिळवून पंचाहत्तर वर्षे झाली....आता तरी सुधरा... सत्तेची नशा वाईट असते....सरकार ओढत नाही म्हणून काटा -छापाचा खेळ सुरू आहेत मात्र सरकार पडणार नाही.... एकतर्फी प्रेमात मुलीने नाही म्हटलनतर नराधम ऍसिड फेकतो...तसे काही लोक महाराष्ट्राची संस्कृती व प्रतिमे वर ऍसिड फेकत आहे....!! हा बाणा नव्वदीच्या दशकातील स्वर्गीय बाळासाहेबांचा...... आपल्या तिखट माऱ्याने ज्या प्रकारे गोलंदाज क्रिकेटच्या मैदानावर एका संघाला भुईसपाट करतो त्याच प्रकारे बाळासाहेब विरोधकांना चारीखाणे चित करायचे....  

उद्धवजीत शेवटी बाळासाहेबांचा रक्त सळसळतोय....शांत व महाराष्ट्राची शान टिकवायची म्हणून मिथ्या मनाने राजकीय खेळी खेळणाऱ्या दिग्गजाला खिजवण्याचा प्रकार सुरू होता... मात्र आता या कर्णधाराने पलटवार केलंय.... होय करावाच लागेल...! होय... आता पुरे झाले.

दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे रुप पालटून गेलं ... 
मनातील चीड त्यांनी बोलून दाखविली तीही आपल्या वडीला सारखी. खरं म्हणजे गेल्या अडीच वर्षा पासून सत्तेत आलेल्या महाविकास आघाडीच्या विरोधात ह्या ना त्या कारणाने कुरघोड्यांचे राजकारण विरोधक करत आहे. कुठं तरी मनातली सळसळ उध्दवजींनी व्यक्त केली. आपल्या दमदार भाषणात त्यांनी मोदी-शहा, संघ, सावरकर ते फडणवीस व भाजपचे इतर डाव्या -उजव्यांची चांगलीच खरडपट्टी केली. अगोदरच दोन वर्षे कोविड संसर्गात गेली. शासनाला महसूल मिळत नाही व उलट केंद्राकडून सहकार्य मिळत नसल्याने राज्याचा गड चालवणे म्हणजे तारेवरची कसरत. ही कसरत पूर्ण करतांना तोंडातून गेलेल्या सत्तेचा घास हिरावून गेल्याने तळमळीचे कुरघोड्या ईडी, एनसीबी, सीबीआय मार्फत सुरू आहेत. शरद पवारांच्या खांद्याला खांदा लावून राज्य कारभार पूर्ण दमाने सुरू आहेत. तरी भाजपच्या पोटातील गोळा काही फुटत नाही. मुख्यमंत्री होण्यापूर्वी कोणत्याही सत्तेच्या पदावर नसलेल्या व्यक्तीने महाराष्ट्राची बागडोर सक्षमपणे पुढे नेली. त्यातच तीन पक्षाची कसरत सुरूच आहे. अशा परिस्थितीतही ना डगमगता सत्ता अबाधित ठेवण्याची किमया उद्धवजी गाजवतायत. नेमके हेच भाजपला सलत आहे.

'मी पुन्हा येणार....' असा फुसका बार सोडणारे फडणवीस व सरकार कधी पडणार, याची तारीख पे तारीख देणारे चंद्रकांत दादा यांना अनेकदा तोंडावर पडावे लागले.  "आमचे ते बाळ व दुसऱ्याचे कारटां" ....असं धादांत खोटं बोलणाऱ्यांचे खरपूस समाचार कसं घ्यायचं, हे उद्धवजींना वडिलांनी शिकवलं. उठसूट बोंबलण्या शिवाय विरोधकांकडे काहीच नाही. सुरुवातीस अजित पवारांच्या माध्यमाने फूट पाडून सकाळच्या पहरी शपथविधी पार पाडून घेतला. नंतर आमदारांचा घोडेबाजार मांडून चक्क बोली लावली... जमलं नाही म्हणून केंद्राची बाहुली असलेल्या राज्यपालाकडून सत्तेला त्रास देण्याचा प्रयत्न करण्यात आला. गोड-गोड बोलून आपलेसे करण्याचा प्रयत्न ही फसला, काही मिडिया व राजकीय चाटुकारांच्या माध्यमाने सलगी करण्याचा प्रयत्न ही उद्धवजींनी परतावून लावला. आता काय तर ईडी, आयकर, सीबीआय, एनसीबीच्या माध्यमाने महाराष्ट्रावर हल्ले सुरू आहेत. मात्र याद राखा.... महाराष्ट्र काही कर्नाटक, मध्यप्रदेश किंबहुना गोवा नाहीत. महाराष्ट्रात अस्सल राजकीय तालमीत तय्यार झालेली मराठमोळी जनता पाठीशी आहेत. युपी-बिहार सारखी मूर्ख जनता नाहीत. तुम्ही कितीही नटून-थटून बसलं तरी तोंडाला पाणी सुटणार नाही.... सत्तेची गाठ तुटणार नाही... निवांत पाच वर्षे कोपऱ्यात बसून रहा... नसता राजकारणातून भुईसपाट होण्याची वेळ येईल....!!

●अशफाक शेख,
वरिष्ठ पत्रकार, औरंगाबाद