मकबरा व परिसरातील ऐतिहासिक सौंदर्य पाहून G-20 परिषदेच्या महिला प्रतिनिधींनी केला आनंद व्यक्त
औरंगाबाद, दि. २८ फेब्रुवारी : दोन दिवसीय G-20 परिषदेसाठी शहरात आलेल्या शिष्टमंडळातील महिला प्रतिनिधीनी आज सकाळी बिबी का मकबरा (Bibi ka Makbara) या ऐतिहासिक वास्तूला भेट दिली. यावेळी भारतीय पुरातत्व विभागातर्फे पुष्पगुच्छ देऊन पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. मकबरा व परिसरातील ऐतिहासिक वास्तूचे सौंदर्य पाहून त्यांनी आनंद व्यक्त केला.
यावेळी शिष्टमंडळाने सामूहिक फोटोशूट देखील केले. यावेळी इंटयाक संस्थेच्या प्रतिनिधींनी परदेशी पर्यटक महिलांना या वास्तू विषयी माहिती दिली.
मकबरा परिसरात संबंधित सर्व प्रतिनिधींचे स्वागत उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. यानंतर चहा पाण्याचा कार्यक्रम त्यांच्यासाठी आयोजित करण्यात आलेला होता. सर्व परदेशी पाहुण्यांनी वेगवेगळ्या खाद्यपदार्थाचा आस्वाद घेत आनंद व्यक्त केला. 'आंतरराष्ट्रीय तृण धान्य वर्ष' असल्याने या मध्ये विशेष तृणधान्याचा समावेश होता.यात मूग ,मटकी, ज्वारी या धान्यापासून बनवलेले खाद्यपदार्थ होते.
महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त बी .बी नेमाने, पुरातत्व अधीक्षक श्री.भगत, उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे, उपविभागीय अधिकारी स्वप्निल मोरे, तहसीलदार शंकर लाड तसेच पोलिस विभागाचे अधिकारी उपस्थित होते.