महाराष्ट्र राज्य वक्फ न्यायाधिकरण वकील संघाच्या नवीन कार्यकारिणीची निवड

महाराष्ट्र राज्य वक्फ न्यायाधिकरण वकील संघाच्या नवीन कार्यकारिणीची निवड

औरंगाबाद, ३ फेब्रुवारी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य वक्फ न्यायाधिकरण वकील संघाचे नवीन कार्यकारिणीची सदर वकील संघाचे ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. निसार अहमद खान व ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. एम झेड ए खान (ताबिश) यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. आता मुजतबा ग़ुलाम मुस्तफा यांचे अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या विशेष सर्वसाधारण सभेत नोंदणीकृत सदस्यांमधून सर्वानुमते नवीन कार्यकारिणीची वर्ष २०२४-२०२६ या दोन वर्षा करिता निवड करण्यात आली.

      नवीन कार्यकारिणीमध्ये अध्यक्ष म्हणून ॲड. जावेद अब्दुल हमीद देशमुख यांची निवड करण्यात आली असून  उपाध्यक्ष म्हणून ॲड. आता मुजतबा ग़ुलाम मुस्तफ़ा, सचिव म्हणून ॲड. मज़हर खान, सहसचिव म्हणून ॲड. मोहम्मद शारिक़ आणि कार्यकारिणीचे सदस्य म्हणून ॲड. हमज़ा खान पठाण, ॲड. खान मोहम्मद शफीउज़्ज़मां, ॲड. शेख मोहम्मद नसीर, ॲड. अब्दुल वकील महसूलदार, ॲड. शेख मुजाहिद, ॲड. मोहसीन खान यांची निवड करण्यात आली. त्यांचे निवडीबद्दल सर्व सदस्यांनी अभिनंदन केले.