वादग्रस्त महिला तहसीलदाराची अखेर बदली : चित्रा वाघ यांचे राज्य सरकारवर टीकास्त्र
अहमदनगर : पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांची अखेर बदली झाली आहे. काही दिवसांपूर्वी ज्योती देवरे यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यानंतर देवरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला होता. लंके यांनी देवरेंवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. दरम्यान, ज्योती देवरे यांची बदली करण्यात आल्यानंतर आता भाजपच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे.
Video : पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांचा आत्महत्येचा इशारा
पारनेर तहसीलदार ज्योती देवरे यांची जळगावला बदली करण्यात आल्याचं समजते. महाविकास आघाडी सरकारचा जाहीर निषेध आहे. हे सरकार लोकधार्जीणे नाही तर त्यांचे आमदार, मंत्री बगलबच्चे धार्जिणे आहेत. ही बदली एका ज्योती देवरेची नाही तर 500 पेक्षा अधिक कार्यरत महिला तहसीलदारांचे मनोबल खच्चीकरण करण्याचे काम या सरकारने केले असल्याची टीका चित्रा वाघ यांनी केली.