गुस्ताखी माफ: अरेरे!! शाळकरी मुलांना तर सोळा!! : गुरुजनांच्या पेशालाच लावला कलंक!!

गुस्ताखी माफ: अरेरे!! शाळकरी मुलांना तर सोळा!! : गुरुजनांच्या पेशालाच लावला कलंक!!

     अगदी दोन दिवसापूर्वी जगभरात भारताचा डंका वाजला. आंतरराष्ट्रीय मीडियाने देशाच्या वैज्ञानिकांचा उदो-उदो केला. आम्ही चंद्रावर पोहोचलो म्हणून.

     आम्ही फुशारकीत जल्लोष करत असतानाच उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगर जिल्ह्याचं मन्सूरपूर शाळेतील मनाला हेलावून टाकणारा एक विडियो व्हायरल झाला. व्हिडियोत गृहपाठ न केलेल्या एका निरागस मुस्लिम विद्यार्थ्याला वर्गातील इतर हिंदू  विद्यार्थ्यांमार्फत गालावर सपासप चापटा मारण्याचा तो व्हिडियो. चौथी पाचवी वर्गातील तो विद्यार्थी. त्या वेळेस ढसा ढसा रडत होता..!! मात्र त्याच वेळी खुर्ची वर बसलेली एक महिला शिक्षिका  हे क्रूर कृत्य करण्याचे आदेश देत होती. दमाने चापट मारणाऱ्या विद्यार्थ्यांना दमाने का मारताहेत? जरा जोरात मारा ना! म्हणून आदेश देत होती. ती सैतानी बाई एव्हढ्या वरच थांबली नाही तरी म्हणे "मी ठरवलंय मुस्लिम विद्यार्थ्यांना हीच ट्रीटमेंट द्यायची ..!! बघा या शिक्षिकेची मस्ती. शैक्षणिक पेशाला काळिमा फासणारी ही माथेफिरू बाई ...!!

      व्हिडियो वायरल झालं, त्या नंतर ट्विटर वर एक ट्रेंड सुरू झालं. *"अरेस्ट तृप्ती त्यागी"
      या त्यागी नावाच्या  धर्मांध, द्वेषाने बरबटलेल्या या बाईने चंद्रावरील आपल्या यशावर चक्क पाणी फिरविले. खरं म्हणजे आजच्या राजकारणात प्रत्येक पक्ष हा धर्म व जातीच्या आधारावर आपल्या राजकीय पोळ्या भाजवतोय. धर्माधारित राजकारणाचा बाजार मांडला जात आहे. त्यात काही धर्मांध संघटनांचा वापर केला जात आहे. आपण मुस्लिम-ख्रिश्चन विरोधी द्वेषाचे राजकारणाचा सर्रासपणे वापर होत असल्याचे पाहतोय. या गलिच्छ व खालच्या स्तरावरील  राजकारणा मुळे अंतरराष्ट्रीय  स्तरावर देशाची प्रतिमा मालिन होत आहे. यावर अनेकदा त्या सत्तांना सुप्रीम कोर्टाने झाप-झापले. नियम केलंय. दुर्दैवाने त्याचे नीट पालन होत नाही. सत्तेच्या गुर्मीत सुप्रीम कोर्टालाही कोणी जुमानत नाही. अगदी तळागाळातील लोकांपर्यंत नियोजितपणे विषवल्ली फैलावली जात आहे. आता पर्यंत मोठ्या पर्यंत असलेली ही विषवल्ली विद्येचे मंदिर असलेल्या शालेय स्तरापर्यंत पोहोचली आहे. त्या मुळेच यूपीच्या मुजफ्फरनगर जिल्ह्यात त्याची प्रतिक्रिया दिसून आली. म्हणजे हिंदू-मुस्लिम द्वेषाचा राग आता चक्क लहान मुलांवर काढण्यात येत आहे. धर्मांधतेच्या अफीमच्या गोळ्या शालेय स्तरावर कोवळ्या विद्यार्थ्यांना दिल्या जात आहे. दंगेखोर, उन्मादी नवीन पिढी तयार केली जात आहे.

   आता पर्यंत या सैतानी वृत्तीच्या शिक्षिकेवर कोणतीच कारवाई झालेली नाही. त्या पित्याने आपल्या मुलाला शाळेतून काढून घेतले आहे. मात्र त्या कोवळ्या मुलाच्या मनावर मानस्तपाचा जो परिणाम जीवन भर असेल त्याचं काय? जर सैतानी वृत्तीच्या क्रूर शिक्षिकेच्या जागेवर एखादी मुस्लिम शिक्षिका असती तर त्याच्या घरावर मुख्यमंत्री योगिनीं बुलडोझर चालवून टाकले असते. अत्यंत क्रूर व माणुसकीला काळिमा फासणाऱ्या युपी व देशाचे नाव बदनाम करणाऱ्या या महिलेच्या शाळेवर बुलडोझर चालविण्याची हिंमत योगी करणार का? घटनेचा व्हिडियो पाहून कोणताही बाप विचलित होणारच. जर तो माणूस असेल तर.

      गेल्या काही वर्षांत पालतू मेडिया चोवीस तास हिंदू-मुस्लिम करत घरा-घरात द्वेष पसरवत आहे. द काश्मीर फाइल्स सारखे चित्रपट निर्माण करून लोकांना थोतांड राष्ट्रवादाचे धडे दिले जात आहे. धार्मिक संघटनांकरवी मुस्लिम, ख्रिश्चन समाज विरोधात धर्मांधतेचे विष पेरले जात आहे. म्हणूनच प्रसिद्ध अभिनेत्री रेणुका शहाणेंनी एक बोलके ट्विट केलयं, "या शिक्षिकेला राष्ट्रीय एकतेचे पुरस्कार दिलं पाहिजे".

      एकूणच हिंदू समाजाच्या लोकांनीच आता सतर्क राहण्याची गरज आहे.  तुमच्या मुलांना विष पसरविणारे यंत्र बनविण्यात येत आहे, उद्या ते दंगेखोर होतील ते तुम्हाला पटणार का?भडकवणाऱ्या नेत्यांची मुलं ऑक्सफोर्ड व इतर  विदेशी शैक्षणिक संस्थेत शिक्षण घेणार, अमितशहांचा मुलगा क्रिकेटची एबीसीडी माहीत नसतांना बोर्डाचा सेक्रेटरी होणार, मंत्री, खासदार, आमदारांची मुलं तेच होणार, आणि तुमची मुलं..?? धर्मांध दंगेखोर होऊन तुरुंगात जाणार...!! म्हणूनच हिंदुंनीच खऱ्या अर्थाने जागृत होण्याची गरज आहे. आज पर्यंत बरबाद होणारे देश फक्त आणि फक्त आपसात वैमनस्य व दंगली करून बरबाद झालेत. ताजे उदाहरण मणिपूर राज्याचे आहे. आज पहा तेथे काय घडतंय. जातीय हिंसेत मणिपूर बरबाद झाला.आपल्या शेजारी शत्रू राष्ट्र पाकिस्तान, सत्तास्वार्थी, भरष्टाचारात बरबटलेल्या नेत्यामुळे अर्थव्यवस्थेत बरबाद होतांना साक्षात पाहतोय. त्या अफगाणिस्तानचे गेल्या वीस वर्षांत सत्तेच्या आहारी गेलेल्या नेत्यांच्या स्वार्थवृत्तीमुळे बरबाद झालयं. तेथे तर फक्त मुस्लिमच आहेत. जरा इतिहास वळून पहा, ढोंगी राजकारण्यांच्या नादी लागून इतिहासाची पुनरावृत्ती करू नका? शेवटी देशात घटना आहे, सर्वांना समसमान अधिकार आहेत. माणुसकी विसरलो तर देशाला बरबादीच्या मार्गावर नेणाऱ्यांच्या यादीत आपलेच नांव अव्वल असेल. शेवटी देश प्रथम आहे, सत्ता नंतर. देश टिकला तर आपण टिकू, लक्षात ठेवा....!!!
-अशफाक शेख, वरिष्ठ पत्रकार, औरंगाबाद.