गुस्ताखी माफ : दहशतवादी मुसलमानच का? खाकीतील मानसिकतेला जबाबदार कोण?

गुस्ताखी माफ : दहशतवादी मुसलमानच का? खाकीतील मानसिकतेला जबाबदार कोण?

गुस्ताखी माफ : दहशतवादी मुसलमानच का? खाकीतील मानसिकता नवीन नाही....याला जबाबदार कोण...? यांच्यावर लगाम कोण लावणार? सत्ते समोरच प्रश्न...!!

निमित्त होते अहमदनगर शहरातील पोलिसांची मॉकड्रिल......
संकटाच्या काळात परिस्थितीला कसं तोंड  द्यावे...
त्या साठीच......
एखाद्या दहशतवादी हल्ला झाल्यास मुकाबला कसं करायचं म्हणून अहमदनगर पोलिसांनी याचं आयोजन केलं.दहशतवादी पकडत असतांनाच त्याने चक्क  "नार ए तकबिर... अल्लाह ओ अकबर" ची घोषणा दिली. घोषणा देणारा  मुस्लिमाच्या वेशभूषेत  पोलिसच....!!
पोलीस अधिकाऱ्यांनी जाणून बुजून अतिरेक्यांच्या भूमिकेत मुसलमान दाखवला....

जर शीख बांधव किंवा एखाद्या भागवाधारी कॅरेक्टर उभारला असता तर सकाळच्या पहारी यांचे निलंबन झाले असते. जसा शाहरुखच्या "पठाण" चित्रपटावरून धिंगाणा झाला. औरंगाबादेत ही अशी मॉकड्रिल करण्यात आल्याची माहिती आहे. म्हणजे राज्य स्तरावर प्रत्येक जागी मुसलमानच अतिरेकी दाखविण्यात आले. गेल्या काही वर्षात देशात मुस्लिम विरोधी द्वेष उफाळला आहे. मीडिया नावाचा क्रूरकर्मा ही त्याला तितकाच जबाबदार...!!
मात्र सत्तेच्या मार्गे प्रशासनात हा द्वेष पसरला असेल तर ही शोकांतिका म्हणावी लागेल.

वाद सुरू झाला आहे.
राज्यभरातील मुस्लिमांनी याचा विरोध केला. एमआयएमचे औरंगाबाद येथील खासदार इम्तियाज जलील यांनी या घटनेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. तिथल्या एसपी व डीजीपींना त्वरित निलंबित करण्याची मागणीही शासन कडे केली. पोलीसांची मानसीकता किती भयानक आहेत....
म्हणून संबंधितावर गृहमंत्र्यांकडे कारवाईची मागणी केली. राष्ट्रवादी युवक कांग्रेसचे नेते सैय्यद ओसामा यांनी तीव्र आक्षेप घेत थेट राष्ट्रपती यांच्या कडे तक्रार पाठविली. खरं म्हणजे पोलीस अधिकाऱ्यांनी च स्क्रिप्ट लिहिली....

अतिरेकी हा मुसलमानच असतो ही पक्की भावना त्याच्यात असणारच....
मात्र या  मॉकड्रिल मुळे पोलिसांच्या भूमिकेवरच संशय व्यक्त केलं जाणं साहजिकच. आम्ही सर्वच अधिकारी असले असतात असे ही नाही...
इस्लाम धर्म तसेच जगातील मुस्लिमांत वरील शब्दांचा अत्यंत आस्था व आदर आहे. याचे विडिओ शूट करून ते ही समाजात पसरविण्यात आले. पुन्हा एकदा मुसलमानच हा अतिरेकी असतो....
अशी भावना लोकांच्या मनावर बिंबविण्याचा हा मानसिक आजारपण....!!.

अगदी जवळच्या काळात असे अनेक आरोप केले गेलेत. त्यात अनेक आरोप झालेत. विशेष करून दंगलीच्या काळात पोलिसांच्या भूमिकेवरच संशय व्यक्त करणे काही नवीन नाही. देशाच्या अनेक कोर्टात पोलिसांच्या भूमिकेवरून पोलीस प्रशासनाला फटकारण्यात आलेत. अलीकडेच दिल्ली दंगलीत पोलीसांच्या मुस्लिमांच्या अटकेची कोर्टाने पोलखोल केली. 18 फेब्रुवारी 2007 च्या समझोता एक्सप्रेस बॉम्ब विस्फोट प्रकरणात तर अभिनव भारत संघटनेचा हात असल्याचे उघड झाले. त्यात कर्नल पुरोहित, स्वामी असीमानंद संलग्न असल्याचे स्पष्ट झाले. 11 ऑक्टोबर 2007च्या अजमेर दरगाह विस्फोट प्रकरणी स्वामी असीमानंद, भावेश पटेल यांना अटक झाली. स्वामी असीमानंद याने तर चक्क "होय मी सामील होतो", म्हणून स्वीकार केला. 29 सप्टेंबर 2008 च्या मालेगाव बॉम्ब विस्फोटात तर चक्क भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह यांना महाराष्ट्र एटीएस ने अटक केली होती. श्याम भवरलाल साहू व शिव नारायण गोपालसिंह यांना ही या प्रकरणी आरोपी करण्यात आले. अश्या अनेक घटना आहेत ज्यात भगव्या दहशतवाद असल्याचे स्पष्ट झाले. दुर्दैवाने आमच्या कडे शेकडो माणसं मेल्या नंतरही त्यांना न्याय मिळत नाही. 2002च्या गुजरात दंगली हजारो लोकांचा जीव नंतरही या प्रकरणांचा काय झालं? बीबीसीने तर यावर एक डोकमेंटरी बनविली. हे जगा समोर आहे. पोलिसांची भूमीका जगाने उघड्या डोळ्यांनी पाहिली.
अतिरेकी कोणीच असो.....हिंदू असो की मुसलमान...तो देशद्रोहीच...

मात्र खाकीतील काही जातिवादी मानसिकता जिवंत आहेत. कॅरेक्टरला दाढी, टोपी न घालवता कसाब सारख्या वेशभूषेतील व्यक्तीला उभा केला असता. त्यात काय? असले किळसवाणे प्रकार थांबले पाहिजे. प्रत्येक समाजात वाईट लोकं आहेत....
मात्र त्यावरून पूर्ण समाजाला बदनाम करण्याची व प्रतिमा प्रतिबिंबित करण्याचा प्रकार डोकं फिरवणारा आहे. राज्याचे गृहमंत्री देवेंद्रजी सज्जन माणूस....
ते भाजपचे असले तरी त्यांची सामाजिक उंची आहे. त्यांनी असले प्रकार थांबवावेत.खाकितील असल्या "मानसिक आजारपण असलेल्या अधिकाऱ्यांचा" शोध घ्यावा. कडक कारवाई करावी......

महाराष्ट्र हा फुले, शाहू, आंबेडकरांचा.... हा काही युपी-दिल्ली राज्य नाही.... लक्षात ठेवा....!
(जय हिंद)

- अशफाक शेख
वरिष्ठ पत्रकार, औरंगाबाद.