गुस्ताखी माफ : मणिपूर, नुह-गुरुग्राम हिंसा आणि आंतरराष्ट्रीय मीडिया.! हिंदू राष्ट्रवादी सत्तेचा उल्लेख.!भारताची बदनामी.! तरीही जनता निवांत... शांत कशी...?

गुस्ताखी माफ : मणिपूर, नुह-गुरुग्राम हिंसा आणि आंतरराष्ट्रीय मीडिया.! हिंदू राष्ट्रवादी सत्तेचा उल्लेख.!भारताची बदनामी.! तरीही जनता निवांत... शांत कशी...?

भारतातील सर्वात जास्त अर्थसत्ता असलेले शहर हरयाणातील गुरुग्राम...!! गेल्या आठवड्यात नुह-आणि गुरुग्राम शहरात जातीय हिंसे नंतर आता शांत होत आहेत.मात्र सामान्य लोकांच्या चेहऱ्यावर चिंता आणि भीती आहे.येथील सेक्टर सत्तर मधील एक झोपडपट्टी...जेमतेम शंभर कुटुंब...तेही रोजगार साठी बंगाल व बिहारातून आलेले...मात्र आज एका आठवड्यात फक्त सहा कुटुंब शिल्लक आहेत.का?तर ते जातीने,नावाने मुसलमान होते.अत्यंत गोरगरीब... हातावर काम मिळेल त्यावर  रोजी रोटी  कमविणारे.... रात्री-बेरात्री कधी जात्यंध हल्लेखोर येतील व त्यांच्या संसाराची...जीवाची राखरांगोळी करतील या भीतीने त्यांनी पलायन केलेत.हा नवीन भारत आम्ही उघड्या डोळ्यांनी बघतोय...तरीही सत्तेचे शिलेदार असो किंवा विरोधक.. सामान्य जनता असो किंवा गगनचुंबी इमारतीत हाय प्रोफाईल अंकल....घराच्या हॉल मध्ये ती टीव्ही बघत किंवा वॉट्सप,ट्विटर वर बोध देणारा...ज्ञान वाटणारा पगारदार नोकर वर्ग!!माझ्या घरा पर्यंत ही आग आली नाही ना..?माझा पगार तर तगडा आहे.म्हणून या गोरगरीब व सामान्य लोकांशी काय घेणं देणं...असली ही बेफिकीर मानसिकतेची.... जिवंत असून ही मेलेली जमात...!!देशात शांतता नांदावी,खरंच सर्व समाज,घटक,धर्मियांत ऐकता, बंधुता असावी....कोणालाच चिंता नाही.

      मात्र सावधान....तुमच्या या कर्तुती मुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर बदनाम होतोय...!!

     गेल्या काही वर्षांत  *पाश्चिमात्य मीडियाने भारताच्या  धर्माध, जातीवादी, हिंसेच्या घटना वर विशेष लक्ष वेधले आहे.एक ऑगस्टच्या न्यूयॉर्क टाईम्सने तीन महिन्यात पासून जातीय हिंसेत धुमसणाऱ्या मणिपूर ते हरयाणातील नुह व गुरुग्राम हिंसेचा भला मोठा लेख छापला.लेख मध्ये मोदींना चक्क हिंदू राष्ट्रवादी सत्तेचा नेता म्हणून उल्लेख केला गेला.गेल्या काही वर्षांत मोदींच्या नेतृत्वात हिंसेच्या असामान्य घटना काही नवीन नाही,असे म्हटलं गेले.चिंता या साठी व्यक्त केली गेली की पुढच्या सप्टेंबर महिन्यात जी-20 ची बैठक होत आहे.हिंसेचे ठिकाण गुरुग्राम मध्येही एक बैठक होणार आहे.अश्या वेळी दिल्ली पासून शंभर किलोमीटर दूर नुह-गुरुग्रामच्या घटना चिंतेत टाकणाऱ्या असल्याचे म्हटले गेले. बीबीसीने या जातीय हिंसे वर स्टोरी केली आहे.एपी संस्थेने जी-20 पूर्वी हिंसेच्या घटनांना गंभीर घटना असल्याचा उल्लेख केला.तसेच मोदींना हिंदू राष्ट्रवादी नेता म्हटलं व त्यांच्या नेतृत्वात देश असतांना जातीय हिंसा वाढताहेत. असा टोला लगावला.न्यूज एजन्सी रायटरनेही अश्याच प्रकारची बातमी करत मोदी असतांना भारतात जातीय तांडव वाढल्याचा उल्लेख केला.तुर्कस्तानच्या मीडिया टीआरटी वर्ल्ड तर्फे नुह-गुरुग्राम घटनांना हिंदूवादी नेत्यांचा भडकवणाऱ्या पोस्ट जबाबदार असल्याचे म्हटले.बजरंग दल संघटनेच्या धर्माध विचारानेच जातीय हिंसेला खतपाणी घातले, असे सांगण्यात आले.मुस्लिमांना पोलीस मनमानी पद्धतीने अटक करत असल्याचाही उल्लेख आहे.तेच  पाकिस्तान मीडियात या घटना मोठ्या बातम्या आल्या.इंग्रजी दैनिक डॉन ने निवडणूक जवळ आली की भारतात असे जातीय हिंसाचार वाढतो,जाणूनबुजून मुसलमानांना टार्गेट केले जात असल्याचा आरोप ठळकपणे केला गेला आहे.या मुळेच कट्टरपंथी वोट बँक भाजपचं पाठराखण करते की आम्ही मुसलमान विरोधात किती कठोर आहोत.

      दुर्दैवाने भारतातील मिडिया ही जातीय तेढ निर्माण करण्याचे साधन झाले आहेत.धार्मिक सलोखा असावा म्हणून साधी सामाजिक जबाबदारी नाही. त्यावर सत्ता ही लगाम लावत नाही. बेलगाम, बेफाम मिडिया परिस्थिती कशी आटोक्यात येईल, असं न करता हिंदू-मुस्लिम डिबेट करत तांडव माचवत आहे.मणिपूर असो की नुह-गुरुग्राम.... शेवटी सत्ता, विरोधी पक्ष आरोप-प्रत्यारोप करत धिंगाणा घालणार.... पोलीस प्रशासन करवी सत्तेच्या तालावर नाचनार.... मग मोनू मानेसर सारखं धर्मांध गुंड मोकाट फिरणारच...!! आश्चर्य म्हणजे गुरुग्राम हिंसेच्या ठिकाणी बजरंगदलाचा सचिव व पेशाने वकील अशोक बाबा हा पोलिसा समक्ष गोळीबार करत होता.तो ही चक्क एका मंदिरातून.... या व्हिडियोत पोलीस अत्यंत प्रेमाने या बाबाला सावरत माघे घेत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.म्हणजे नवीन भारतात चक्क पोलिसांच्या संरक्षणात गोळीबार करण्याचा अधिकार मिळाला आहेत का?त्याच्या जागी जर एखादा मुसलमान असता तर त्याला तिथेच गोळ्या घातल्या गेल्या असता?नंतर आपला चाटु मीडिया आहेच ना.......पोलिसांनी स्वयंरक्षणात प्रति उत्तर दिलं म्हणून व तो मारला गेला.आता तरी शहाणा होण्याची गरज आहे..…..!! (जयहिंद)


-अशफाक शेख, वरिष्ठ पत्रकार