गुस्ताखी माफ : पुन्हा गुजराती गॅंग - झेड प्लस ची ऐशी तैशी, पटेल ऐवजी पठाण असता तर?
नांव-किरणभाई पटेल, अमित पंड्या, (गुजरातचे मुख्यमंत्री यांचे जनसंपर्क अधिकारी हितेश पंड्या यांचा मुलगा), रा. अहमदाबाद, जय सितापरा रा. राजकोट, गुजरात, या तिघा नटवरलाल यांना जम्मू-काश्मीर पोलिसांनी अटक केली आहे. तिसरा साथीदार राजस्थान येथील आरएसएसचा त्रिलोकसिंग सध्या फरार आहे. किरण पटेल नावाच्या या फ्रॉड व्यक्तीने गेल्या सहा महिन्यात देशाच्या सर्वात संवेदनशील प्रदेशात झेड सुरक्षा कवच घेऊन पर्यटन केले. पंतप्रधानांच्या कार्यालयात अतिरिक्त निदेशक असल्याचे भासवून त्याने जम्मू काश्मीर पोलिसांना वेड्यात काढलं. स्वतःला गुजरातचे नव्हे तर अनेक केंद्रीय मंत्र्यांचा जवळचा दाखवत शासकीय खर्चावर फाईव्ह स्टार हॉटेलात थाटात राहण्याची व्यवस्था करून घेतली.
हे दोन चार दिवस नव्हे तर चक्क सहा महिन्यात पासून सुरू होते. कोणालाही कल्पना नाही की हा माणूस फ्रॉड आहे. मात्र सत्तेच्या सानिध्यात असल्याने या व्यावसायिक दलालने सर्वांनाच उल्लू बनविले. मोदी-शहा यांच्या जवळचा दाखवल्यास अरे बाप रे कोणाची हिंमत होणार का? बाबा, तू कोण आहेस म्हणून..!
हाय सेक्युरिटी झोन मध्ये असला निर्लज्ज प्रकार म्हणजे देशात आमची सुरक्षा यंत्रणा किती कमकुवत आहे,ही घटना दाखवून देणारी. मात्र एक व्यक्ती जर झेड प्लस सेक्युरिटी एन्जॉय करत असेल व तो ही काश्मीर सारख्या राज्यात तर त्याचा वरदहस्त गुजरात दिल्लीत असल्या शिवाय शक्यच नाही. अमितशहांच्या गृह खात्यावर जबाबदारी येऊन ठेपली आहे. मात्र सर्वच गप्प आहे. करण पापाचा घडा फुटला आहे. दिल्ली ते काश्मीर पर्यंत सर्वच प्रशासकीय यंत्रणा तोंड लपवत फिरत आहेत. कोणालाच नीट उत्तर देता येत नाही.
विशेष म्हणजे काश्मीरच्या अत्यंत संवेदनशील ठिकाणी झेड सुरक्षा कवच मध्ये हिंडताना त्याने सोशियल मेडिया वर खुलेआम फोटोज़, विडिओ शेअर ही केले. आता तो आणि त्याचा साथीदार जेलात आहेत. चाटु मीडिया मूग गिडून बसली आहे. प्रश्न असा की या पटेलच्या जागी जर पठाण असता तर या चाटुकारांनी किती धिंगाणा घातला असता.
किरण पटेल हे नाव अहमदाबाद येथे नवीन नाही.तो फ्रॉड व्यक्ती आहे,हे तिथल्या राजकीय धारकर्यांनाही माहीत आहे. किरण पटेल चारा घोटाळ्यात पौने दोन कोटी खाल्ल्याचा, स्वामींनारायनसेठ नावाच्या व्यक्ती बरोबर बसेस घेण्याचं प्रकरणात हात साफ केलं, त्याचे चौदा चेक बौन्स झालेत.एका गरबा कार्यक्रमाचे पैशेच घेऊन हा नटवरलाल फरार झाला होता.हा भामटा म्हणूनच ओळखला जातो,मात्र भाजपच्या मांडीवर बसणारे दुधाचे धुतले कसं होतात हे नवीन नाही. आता हा किरात पटेल बघा ना, म्हणे तो काश्मीर विकासाच्या स्पेशल मिशन वर आलंय, असं दाखवलं गेलं. त्याने अनेक आजी माजी अधिकारी यांच्या सोबत बैठका ही घेतल्या. अनेकांना चांगल्या पोस्टिंगच्या चॉकलेट्सही दिलं.
विशेष म्हणजे या पूर्वी भारतात होणाऱ्या जी-20 संमेलनासाठी दिल्लीत फाईव्ह स्टार हॉटेलात एक बैठक ही घेतली होती. तो आपण सत्तेचं नीती व सल्लागार पदावर असल्याचे दाखवत असे. त्याला चक्क बुलेट प्रूफ कार मधूनच अटक करण्यात आली. तेव्हा त्याने "मी गुजरातेत व्यावसाईक डीलिंग साठी आलो होतो, माझ्यावर सत्ते कडून महत्वाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. मात्र तो गुजराती व्यापाऱ्यांच्या दलाल म्हणून आला होता, असे निदर्शनात आले आहे.
कलम 370 हटविल्या नंतर तेथील जमिनींचे भाव वधारले आहे. सफरचंदाच्या बागाईतीचा कॉन्ट्रॅक्ट साठी आपण संधी शोधत असल्याचे तो सांगतोय. एकूणच हा धंदेबाज माणूस. मात्र मंत्रालयात लोकांच्या कामा साठी दलाल हिंडतात व आपलं कनेक्शन नेत्या बरोबर दाखवतात,असलाच हा प्रकार.
हे पण वाचा : महाराष्ट्रातील दोन कॅबिनेट मंत्री गैर कायदेशीर मंडळीत
या प्रकरणी किरण पटेल अजूनही पकडला गेला नसता. मात्र आपल्याच मुर्खपणाने तो पकडला गेला. त्याने हाय सेक्युरिटी झोन चे फोटो ट्विटर वर शेअर केलं. मी कसा झेड प्लस सुरक्षा घेऊन मजा मारतोय. मात्र इथंच त्याचा बँडबाजा वाजलाय. काश्मीर पोलिसांनी अजूनही कोणाच्या सांगण्या वरून किरण व त्याच्या साथीदारांना झेड प्लस सेक्युरिटी पुरविली, ही बाब समोर आली नाही किंवा येणार नाही. कारण सर्वच गडबड घोटाळा आहे. आता दिल्लीत कांग्रेस वाल्यांनी किरण पटेल याचे अमितशहा बरोबर सेल्फी शेअर केलं आहेत. मोदी बरोबर ही फोटो येतीलच, मात्र प्रत्यक्ष कारवाई होईल का? नाहीच नाही. कारण सुरुवातीला ही बातमी मसाला लावून मीडियात चालू होती. आता दिल्लीचीच पोलखोल होत असल्याने त्यांची पुंगी बंद करण्यात आहे.
देशाच्या सुरक्षेच्या नावाखाली वरील प्रकार हा अत्यंत चिंताजनक आहे.ते ही काश्मिरात, पूर्व आयबी अधिकारी दिनेश व्होरा यांनी एका मुलाखतीत सांगितले. "देशात वरच्या लेव्हलला जे काही घडत आहे ते अत्यंत गुप्त, उलगडा न होणाऱ्या गोष्टी आहेत. ते पण सत्तेच्या आशीर्वादाने. त्या मुळे असले प्रकार डोकं फिरवणारे आहे. आता पर्यंत जे घडलं नाही ते अशक्यप्राय गोष्टी समोर येतायेत. वरूनच असल्या प्रकारांना खतपाणी घातलं तर सुरक्षेचा बट्ट्याबोळ झाल्या शिवाय राहणार नाही. "आणि अखेरचं. जर या किरण पटेलच्या जागी खरोखरच एखादा पठाण असता तर. ही चाटु मीडियातील पोपट व सत्तेचे चिंटू बिडातून फूर-फुर बाहेर निघाले असते. व जिहादी, पाकिस्तान, मुजाहिदीन, देशपर हमला, देश के साथ गद्दारी वगैरे, वगैरे बोंबा मारल्या असत्या. सुदैवाने ते शक्य ही नाही. देशाचे दुर्दैव म्हणा किंवा देश बदल रहा है....!!! (जयहिंद)
-अशफाक शेख, वरिष्ठ पत्रकार, औरंगाबाद.