औरंगाबाद येथुन थेट जद्दा ( सऊदी अरब)  विमानसेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार : खासदार इम्तियाज जलील

औरंगाबाद येथुन थेट जद्दा ( सऊदी अरब)  विमानसेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार : खासदार इम्तियाज जलील

औरंगाबाद : मराठवाडा व आसपासच्या परिसरातून हज व उमराह यात्रेसाठी आठवड्यातून मोठ्या प्रमाणात भाविक जात असतात. तसेच विदर्भ, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्र येथील भाविकांना हज यात्रेला जाण्यासाठी मुंबई हेच एकमेव ठिकाण असल्याने येथे यात्रेकरूंना मोठ्या प्रमाणात खर्च व विविध अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने या परिसरातील नागरिकांसाठी औरंगाबाद येथून सौदी अरेबियाला जाण्यासाठी आठवडयातून एकदा थेट विमान सेवा सुरू करण्यात यावे. तसेच औरंगाबाद येथे बांधण्यात आलेले हज हाऊस उमराह व हज यात्रेकरुसाठी राखीव ठेवण्यात यावे,अशी मागणी शासन दरबारी आपण मांडणार आहेत अशी माहिती जिल्ह्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी आमंत्रित केलेल्या बैठकीत दिली.

          खासदार इम्तियाज जलील यांनी आज दिनांक 21 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजता हज आणि उमराहसाठी जाणाऱ्या भाविकांच्या सोयी सुविधासाठी चालवण्यात येणाऱ्या टूर्स आणि ट्रॅव्हल्स धारकांना भेडसावणाऱ्या समस्या जाणून घेण्यासाठी सुभेदारी विश्राम गृह येथे बैठक बोलावली होती. यावेळी मोठ्या संख्येने हज व उमराह टूर्स संचालक उपस्थित होते. त्यांनी खासदार जलील यांच्या समोर त्यांना भेडसावणाऱ्या शासकीय व खाजगी स्वरूपाच्या समस्या मांडल्या. समस्त समस्या सोडविण्यासाठी व जास्तीत जास्त सोयी सुविधा मिळाव्या याकरिता शासकीय तसेच सबंधित कार्यालयाना भेटुन सोडवण्यात येईल असे आश्वासन खासदार इम्तियाज जलील यानी यावेळी दिले. तसेच यासाठी सर्वांची साथ लागेल असे ही प्रतिपादन केले.
         खासदार इम्तियाज जलील म्हणाले केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासमोर मी हज व उमराह यात्रेकरूंना औरंगाबाद येथून थेट विमानसेवा सुरू करण्यात यावे अशी एका बैठकीदरम्यान मागणी केली होती. तसेच मराठवाडा, विदर्भ व उत्तर महाराष्ट्र या परिसरातील मोठी संख्या हज व उमराह यात्रेसाठी जाणारी असल्याने याबाबतीत केंद्र शासन सोबत सविस्तर चर्चा करून लवकरच सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी करण्यात येईल. तसेच विमान सेवा देणाऱ्या कंपनीला सुद्धा आठवड्यातून एक फ्लाईट सौदी अरेबियाला जाण्यासाठी सुरू केल्याने तुम्हाला या माध्यमातून फायदाच होऊ शकतो असा लिखित स्वरूपात आपल्याला विश्वास द्यावा लागेल. असेही मत त्यांनी यावेळी मांडले.
          सौदी अरेबियासाठी येथून थेट विमानसेवा सुरू केल्याने मोठ्या प्रमाणात रोजगारासह हॉटेल व्यवसाय वाढीस लागेल. त्यामुळे आपल्या शहराचाच विकास होईल. यामुळे येथिल गरिब व बेरोजगार युवकांना रोजगार तर मिळेलच त्या सोबत हे तरूण आपला व्यवसाय सुद्धा शकत असल्याची माहिती दिली.
          दरम्यान, तांबोली टूर्स, राबता हज उमराह सर्व्हिस, सानी टूर्स, अल अझीझ टूर, वंडर ट्रॅव्हल्स, दानिश ट्रॅव्हल्स, अल अझीझ ट्रॅव्हल्स, अल किदमा ट्रॅव्हल्स, मोहम्मदी टूर, अल हुझैफ टूर्स, अल अमोदी टूर्स, आयेशा टूर्स, मुकद्दस टूर्स, अल फतह टूर, मलिक टूर्स, हाफिज बंधू, फरहान टूर, अरेबियन टूर्स, कोहिनूर टूर,आशियाई टूर व सुगरा टूर्स यांच्या सह इतर टूर्स संचालकांची उपस्थित होते.